Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आपण सध्या शेतीच्या उत्पन्नाबद्दल बघत आहोत. सहसा करदाते शेतीचे उत्पन्न दाखवतात व आयकर अधिकारी त्याला सहसा मानत नाही व या मुळे करदात्याची परेशानी होते. येथे शेतीचे उत्पन्न म्हणजे नेमके काय? या बद्दल माहिती घेत आहोत, जे व्यवहारात सोप्या प्रश्नोत्तर भाषेत असल्यामुळे उपयोगी ठरावे.

प्रश्न- जॉर्ज फर्नांडीस यांनी स्पेशल टाईपचे घास उगवले. ते घास गोल्फ खेळण्याची जागे साठी उगवले गेले. याच्यातून जे उत्पन्न आले ते फर्नांडीस यांनी शेतीचे उत्पन्न म्हणून दाखवले परंतु इन्कमटॅक्स अधिकाऱ्याने ते साफ नाकारले. त्यांचे म्हणणे होते कि हे घास गोल्फ खेळण्यासाठी उगवले होते म्हणून ते शेतीचे उत्पन्न नाही. कारण गोल्फ हे काही शेतीत मोडत नाही. आणि हे संबंधित घास गोल्फसाठी उगवले गेले होते. इथे जॉर्ज फर्नांडीसचे म्हणणे बरोबर आहे कि इन्कमटॅक्स ऑफिसरचे ?
- कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध पी.झेड.इस्टेट्स प्रायवेट लिमिटेड असा केस दिल्ली हायकोर्टासमोर आला. या केस मध्ये दिल्ली हायकोर्टाने सविस्तर चर्चा केली व असे निर्णय दिले कि गोल्फ कोर्स तैयार करण्यासाठी जे घास उगवले गेले ते शेतीचे उत्पन्न आहे. जॉर्ज फर्नांडीसच्या केस मध्ये या केसच्या आधारे असेच सांगता येईल कि येथे सुद्धा गोल्फ कोर्स साठी उगवलेल्या घासाचे उत्पन्न शेतीचे उत्पन्न आहे.
प्रश्न- रामराव यांना डेअरी पासून रु. 2 लाख उत्पन्न मिळाले. हे डेअरीचे उत्पन्न शेतीचे आहे असे रामराव म्हणतात तर इन्कमटॅक्स ऑफिसर याला नाकारतात. ते यास शेतीचे उत्पन्न मानण्यास तैयार नाही. येथे रामरावचे म्हणणे बरोबर आहे कि इन्कमटॅक्स ऑफिसर यांचे म्हणणे बरोबर आहे.- रामराव यांना डेअरी पासून जे उत्पन्न मिळाले ते शेतीचे उत्पन्न होत नाही. या मुळे रामराव यांचे म्हणणे येथे बरोबर नाही. इन्कमटॅक्स ऑफिसर यांचे म्हणणे येथे योग्य आहे. हे शेतीचे उत्पन्न धरले जाणार नाही व या उत्पन्नावर रीतसर इन्कमटॅक्स लागेल. म्हणून येथे रामराव यांना डेअरी पासून मिळालेल्या 2 लाखाच्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागेल.

इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघण्यात येईल. आपले प्रश्न कृपया वॉटसअप वरच विचारावे.