Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

उत्पन्नाचे किती प्रकार आहेत ?

प्रश्न – एक्टीव इन्कम म्हणजे काय ?

असे उत्पन्न जे कमवण्यासाठी व्यक्ती स्वतः हजर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही लांब सुट्टी घेतली तर ते उत्पन्न एक तर कमी होते किंवा बुडते. समजा जर तुम्ही आठ महिने सुट्टी वर राहिले तर त्या आठ महिन्याचे उत्पन्न बुडेल, कारण येथे तुम्ही प्रत्यक्ष हजर नाही.


प्रश्न – पॅसीव इन्कम म्हणजे काय ?

तुम्ही हजर आहात किंवा नाही हे या उत्पन्न साठी महत्वाचे नसुन इथे तुम्हाला उत्पन्न मिळत राहते. यालाच हिंदी मध्ये “ दिन जाओ , पैसा आओ “ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


प्रश्न – एक्टीव इन्कम चे उदहरण सांगावे ?

 पगार ही एक्टीव इन्कम आहे यात सरकारी, निम सरकारी किंवा प्रायवेट नोकरदार येतात, व्यापारी यांची बिजनेस इन्कम तथा डॉक्टर, वकील, सी. ए. यांची प्रोफेशनल इन्कम याचे उदाहरण आहे.


प्रश्न – पॅसीव उत्पन्नाचे उदाहरण सांगावे ?

 खालील काही पॅसीव उत्पन्नाची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. व्याज मग ते कोणते ही असो ते पॅसीव इन्कम आहे.

भाडे याचे दुसरे उदाहरण आहे. पोर्टफ़ोलिओ उत्पन्न हे तिसरे उदाहरण आहे. तुम्ही हजर असो किंवा नसो, उत्पन्न मिळत राहते यास पॅसीव उत्पन्न असे म्हणतात.


प्रश्न –– एक्टीव उत्पन्न चांगले की पॅसीव उत्पन्न चांगले ?

 खरे तर उत्पन्न कोणते ही असो, ते चांगलेच आहे. तरी कधी ही एक्टीव इन्कम पेक्षा पॅसीव उत्पन्न चांगले असते. कारण एक्टीव इन्कम मध्ये आपण स्वतः गुंतलेलो असतो. मात्र पॅसीव उत्पन्नात आपण मोकळे असतो. आपण एका प्रकारे Free असतो तरी मात्र उत्पन्न चालुच असते. म्हणजेच उत्पन्न सारखे मिळत राहते.


पुढच्या रविवारी अधिकची माहिती बघणार आहोत.