Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आतापर्यंत आपण विविध विषय बघितले. वाचकांचे रिविजन व्हावे म्हणून लिहित आहे की, त्यात प्रामुख्याने भारतात किती लोक टॅक्स भरतात, भारतीय नागरिक फाईल बनविण्यासाठी का घाबरतो. नवीन इन्कमटॅक्सची फाईल कशी बनवावी, ऑनलाईनचे काय परिणाम होतील, फाईल बनविण्याचे विविध फायदे, पती-पत्नी एका धंद्यात कधी पार्टनर होऊ शकतात व कधी पार्टनर होऊ शकत नाही, इन्कमटॅक्स रिर्टन कसे व कुठे दाखल करावे, वरिष्ठ नागरिकांना विशेष काय फायदे आहेत, आयुर्विमा व पीपीएफचे अनेक फायदे व पर्याय, एका दिवसात दहा हजार पेक्षा जास्त खर्च केल्यास काय व कसे परिणाम होतात या बद्दल सविस्तर बघितले. आज पासून आता आपण इन्कमटॅक्सच्या परमानंट अकाऊंट नंबर तथा आधार कार्ड नंबरशी जोडण्याविषयी माहिती बघत आहोत.

प्रश्न - परमानंट अकाऊंट नंबर म्हणजे इन्कमटॅक्स मध्ये याचे अर्थ काय आहे ? 

- प्रत्येक करदात्यास एक युनिक ओळख नंबर दिला जातो, ज्या नंबरव्दारे त्या करदात्याची ओळख होते, त्या दिलेल्या नंबरास इन्कमटॅक्स मध्ये परमानंट अकाऊंट नंबर म्हणतात. याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रश्नोतरात बघणार आहोत.

प्रश्न - परमानंट अकाऊंट नंबर कोणाला घेण्याची आवश्यकता आहे ? 
- ज्यांना पॅन अद्याप दिलेला नाही, अशा व्यक्तींना पॅन नंबर साठी अर्ज करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश आहे.

1) जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कायद्यात दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास त्या व्यक्तीला परमानंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन नंबर द्यावे लागेल. परमानंट अकाऊंट नंबर यालाच संक्षिप्त मध्ये पॅन असे म्हण्टले जाते.

2) जर एखाद्या व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल 5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा एखाद्या व्यावसायिकाची वार्षिक ढोबळ आवक 5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यालाही पॅन नंबर घेणे आवश्यक आहे.

3) जर कोणास ट्रस्ट किंवा सोसायटीचे इन्कॅमटॅक्स रिटर्न भरायचे असल्यास त्या व्यक्तीस पॅन नंबर घेणे आवश्यक आहे.

4)
जर कोणी मालक असेल व त्यास फ्रिंज बेनिफिटसाठी पॅनची अवश्यकता असेल तर पॅन घेणे गरजेचे आहे.

5) 2 ज्या व्यक्तींना भारत सरकार व्दारे पॅन नंबर घेणे कम्पलसरी केले गेले असेल त्या सर्वांना पॅन नंबर घेणे आवश्यक आहे. त्यात इम्पोर्टर्रस, एक्सपोर्टर्रस, सेन्ट्रल एक्साइज मध्ये येते असलेले अनेक व्यक्तींचा समावेश होतो.

पॅन नंबर घेण्यासाठी कोणत्या व्यक्तीस कोणते कागदपत्रे द्यावी लागतात याची सविस्तर माहिती तथा पॅन बद्दलची नवीन माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.