Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न – फार्म 49 A,

Area Code

AO Type

Range Code

AO No.

वरील अक्षराच्या चौकना खाली काय लिहायचे ते सांगा.

(नागेश मल्हार रणखांबे, सोलापुर) 

- फार्म 49 A मध्ये एरीयाकडे, एओ टाइप, रेंज कोड तथा एओ नंबर भरावे लागतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी सहसा वेगवेगळे कोड आहेत. तुमच्या एरीयाचे वरील सर्व कोडची माहिती तुमच्याशी संबंधीत इन्कमटॅक्स कार्यालयातून घ्यावी व ती लीहावी, याची माहिती तुम्हाला पॅन सेंटर मध्ये ही मिळु शकते किंवा www.utiits.com किंवा www.tin.nsdl.com या वेबसाईट वर सुद्धा मिळु शकते.

सध्या आपण पॅन बद्दल बघत आहोत. शेवटी आता आपण बघणार आहोत की जर पॅन नंबर देण्यात आला नाही तर तसेच पॅन नंबर देण्यास टाळाटाळ केल्यास कायदा कुनाला जबाबदार धरेल या सहीत इतर माहिती सोप्या भाषेत प्रश्नोतर रुपात नेहमीप्रमाणे बघणार आहोत.

प्रश्न – प्रापर्टी विकतांना पॅन नंबर देण्याची जवाबदारी कोणाची राहील ?
- विक्रेत्याने पॅन नंबर देणे कायद्याने आवश्यक केले आहे. त्याने जर पॅन नंबर दिले नाही तरी प्रापर्टी रजिस्टर करणारे म्हणजेच नोंदणी अधिकाऱ्यासही जबाबदार धरले जाईल. याचाच अर्थ असा कि रजिस्ट्रेशन ऑफीसर तथा विक्रेता दोघेही या व्यवहारात पॅन नंबरसाठी जबाबदार धरले जाइल.

प्रश्न - पॅन नंबर देण्यास टाळाटाळ केली तर काय परिणाम होइल ?
- पॅन नंबर देण्यास टाळाटाळ केल्यास जवाबदार व्यक्तीस दहा हजार रुपये (10,000/-) दंड द्यावा लागेल.

प्रश्न - पॅन नंबर दिला परन्तु दुसऱ्याचा नंबर किंवा खोटा नंबर दिला तर काय परिणाम होऊ शकेल ? 
- खोटा नंबर दिला तरी पॅन नंबर देणाऱ्यास 10,000/- रु. दंड होऊ शकतो.

प्रश्न - टी. डी. एस. म्हणजे काय ?
- टी. डी. एस. म्हणजे टॅक्स डीडक्टेड अॅट सोर्स. कायद्या प्रमाणे अनेक उत्पन्नाच्या सोर्समध्ये कायद्याप्रमाणे टॅक्स कापावे लागते त्यास टी. डी. एस. म्हणतात.

प्रश्न - पॅन नंबर दिला नाहीतर टी. डी. एस. कोणत्या रेट (दर) ने करावे लागेल ?
- पॅन नंबर दिला नाही तर कायद्याप्रमाणे टी. डी. एस. हे खालील तीन दरा पैकी जे दर जास्त असेल त्या दराने टी. डी. एस. करावे लागेल. किंवा

१) इन्कमटॅक्स कायद्यात दिलेला दर

२) जे रेट सध्या फोर्स मध्ये असेल ते किंवा

३) 20 % दर

वरील पैकी जे दर सर्वात जास्त राहील त्या हिशेबाने व्यवहारात टी. डी. एस. केले जाइल.

आता पर्यन्त आपण पॅन बद्दल म्हणजेच परमनंट अकाउंट बद्दल सविस्तर विवेचन गेल्या अनेक आठ्वड्यापासुन करत आहोत. पुढील आठ्वड्यापासुन आपण आता नवीन विषय बघणार आहोत. वाचकांच्या काही सुचना किंवा कोणत्या इन्कमटॅक्स संबंधी विषयाची जास्त माहिती हवी आहे त्यांनी कृपया खालील नंबरच्या व्हाट्सअप वर लेखी कळवावे, ही विनंती