Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न- पॅन कार्ड असेल परंतु आधार कार्ड नसेल अशा व्यक्तीस आयकर विवरण पत्र दाखल करता येत नाही का ? आधार कार्डची सक्ती करता येणार नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणते. आयकर विवरण पत्र यास अपवाद आहे का ? कृपया आपल्या सवडीनुसार मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.(विजय घुमरे, शहापूर, ठाणे) 
- पॅन कार्ड असेल परंतु आधार कार्ड नसेल अशा व्यक्तीस आयकर विवरण पत्र दाखल करता येणार नाही. याचे कारण असे की 31 मार्च 2019 ला संपलेल्या आर्थिक वर्ष 2018-19 म्हणजे कर निर्धारण वर्ष 2019-20 च्या सध्या भरत असलेल्या नवीन आलेल्या इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगचा कॉलम आहे. जो पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी सलग्न होत नाही तो पर्यंत इन्कमटॅक्स रिटर्न अपलोड होत नाही. सोप्या भाषेत यालाच असे म्हणता येइल की सध्या तरी पॅन कार्ड आणि आधार कार्ड सलग्न केल्या शिवाय इन्कमटॅक्स रिटर्न भरता येत नाही. तुमचा दुसरा उपप्रश्न असा आहे की आधार कार्डची सक्ती करता येणार नाही असे सुप्रीम कोर्ट म्हणते. आयकर विवरण पत्र यास अपवाद आहे का ? याचे उत्तर असे होऊ शकेल की सुप्रीम कोर्ट म्हणते आधार कार्डची सक्ती करता येणार नाही. या साठी सुप्रीम कोर्टाने तारीख ही वाढवून दिली होती. हे जरी खरे असेल तरी व्यावहारिक अडचण अशी आहे की पॅन कार्ड व आधार कार्ड कम्प्युटर मध्ये लिंक केल्या शिवाय इन्कमटॅक्स रिटर्न भरताच येत नाही कारण इन्कमटॅक्स रिटर्न अपलोडच होत नाही. यात म्हत्वाचे म्हणजे असे आहे की गेल्या आठवड्यातच आलेल्या केंद्रीय बजट मध्ये अर्थ मंत्री मा.निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे की आता पॅन कार्ड इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यासाठी आवश्यक राहणार नाही. फक्त आधार कार्ड असेल तर त्या वरून इन्कमटॅक्स रिटर्न भरता येऊ शकेल अर्थातच याची अमल बजावणी कधी पासून व्यवहारात अस्तित्वात येइल, हे आज सांगता येणार नाही. या साठी थोडा – फार अवधी सरकारला लागू शकेल. 

इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत. वाचकांना विनंती की त्यांनी आपले प्रश्न व्हाट्सअॅपवरच विचारावे.