गेल्या आठवड्यापासून आपण इन्कमटॅक्स मध्ये नवीन विषय बघत आहोत. गेल्या वेळेस आपण जनरल बघीतले की इन्कमटॅक्सच नवीन दर काय आहेत. भारतात किती लोक टॅक्स भरतात. आज आपण त्याच विषयावर अधिक माहिती बघणार आहोत. त्या आधी नेहमीप्रमाणे वाचकांच्या प्रश्न-उत्तर जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - आमची जमीन सिडको ( महाराष्ट्र शासन ) समाविष्ट केली असुन तिची नुकसान भरपाई मिळाली आहे. शिवाय संपादीत जमिनीच्या 10% भूखंड शेतकरी लोकांना मोफत दिला आहे. या भूखंडावर शेतकरी + बिल्डर मिळुन 50%+50% बांधकाम JV Agreement करून ते सदनिकांची विक्री करीत आहे. माझा प्रश्न कसा आहे की जर शेतकरी अशी सदनिका विकत असेल तर ती रक्कम आयकर पात्र आहे का ? ( मोहन तुकाराम पाटील , कालम्बोली ( नवी मुंबई ) - होय, वरील शेतकऱ्यांना सदनिका विकून मिळालेली रक्कम आयकरास पात्र आहे. आता आपण प्रश्नातर रूपात परंतु सोप्याभाषेत पुढील विषय बघणार आहोत.
प्रश्न - नवीन फाइल सुरु करण्यासाठी इन्कमटॅक्स मध्ये टॅक्सेबल उत्पन्न असणे आवश्यक आहे का ? - अनेक करदाते असे विचारतांना दिसतात की आम्हाला इन्कमटॅक्सची नवीन फाइल सुरु करायची आहे. त्यासाठी मात्र आमचे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या खाली आहे. परंतु कायद्याच्या परिभाषेत बघीतल्यास आपणास लक्षात येइल की नवीन इन्कमटॅक्स फाइल बनविण्यासाठी उत्त्पन्न हे करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त असेलच पाहिजे, असे काही नाही. याचाच सोप्या भाषेत अर्थ असा की कोणी ही इन्कमटॅक्स ची नवीन फाइल बनवु शकतो.

प्रश्न - कंपनीज आणि पार्टनरशिप फर्म यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे का ? मिस्टर रामदास यांची प्राइवेट लिमिटेड कंपनी आहे ? त्यांचे म्हणणे आहे की कंपनीला काहीच विशेष उत्त्पन्न नाही. इन्कमटॅक्स रिटर्न भरावे लागेल का ? - होय, रामदास यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरावे लागेल. कंपनीज आणि पार्टनरशिप फर्म यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त कितीही असो, त्यांना रिटर्न भरावे लागेल.
इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.