About
लेखक - सीए गोविंदप्रसाद मुंदडा
जालना
वाट्सअप नं. 9422218428
Author - CA Govindprasad Mundada
Jalna
Whatsapp No. 9422218428
शेती शुटींगसाठी दिली तर उत्पन्न शेतीचे उत्पन्न धरले जाते का ?
आज आपण बघणार आहोत कि जर शेती शुटींगसाठी दिली तर शेतीचे उत्पन्न धरले जाइल किंवा नाही, हे सोप्या भाषेतील प्रश्नोत्तर रुपात सविस्तर बघणार आहोत आजकाल अनेक करदाते आपली शेती असे दुसऱ्या कामासाठी वापरतात व त्याचे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणून इन्कमटॅक्स मध्ये धरतात व मग इन्कमटॅक्स विभाग त्यांना धरते, म्हणून खालील मद्रास हायकोर्टाचे निर्णय अत्यंत महत्वाचे आहे.
प्रश्न – जर शेती ही फिल्म शुटींग साठी दिली तर शुटींग पासुन मिळालेले उत्पन्न हे इन्कमटॅक्स कायद्यात शेतीचे उत्पन्न धरले जाते कि नाही?
असाच नेमका प्रश्न बी-नागीरेड्डी विरुद्ध कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स 258 ITR 719 या केस मध्ये मद्रास हायकोर्टासमोर आला. हेच केस 125 Taxman 20 (Mad)
मध्ये आलेले आहे.
या केसची हकीकत अशी आहे की बी-नागीरेड्डी यांची फिल्म शुटींग होती म्हणजे त्यांनी त्यांची शेती फिल्म शुटींग साठी किरायाने दिली होती. यांच्या इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये एक लाखाच्या वर नुकसान दाखवले होते. या शेतीच्या उत्पन्नाला इन्कमटॅक्स कमिश्नर यांनी विरोध दर्शवला होता. इन्कमटॅक्स ट्रीब्युनल यांनी या उत्पन्नाला हे शेतीचे उत्पन्न नाही, तर शुटींग चे उत्पन्न आहे, असे निर्णय दिले होते. या निर्णया विरुद्ध बी-नागीरेड्डी हे हायकोर्टात गेले होते. बी- नागीरेड्डी हा व्यवसाय विजय गार्डन या नावाने करत होते.
प्रश्न – बी-नागीरेड्डी यांचे हायकोर्टात काय म्हणणे होते?
बी- नागीरेड्डी यांनी हायकोर्टात असे म्हणणे मांडले की जर त्यांची मुळात शेती राहिली नसती तर त्यांची शेती कोणीच शुटींगसाठी घेतली नसती. शेती आहे म्हणून तर शुटींग आहे म्हणून माझी शुटींग ची इन्कम शेतीची धरली गेली पाहिजे.
प्रश्न – इन्कमटॅक्स कमिश्नरचे काय म्हणणे होते?
इन्कमटॅक्स विभागाने याला मान्यता नाकारली. यांचे म्हणणे होते कि यात शेतीला लागणारे मूळ क्रिया किंवा Procession / Activities करावी लागली नाही. शेती आणि शुटींग वेगळे असल्याचे सांगितले. त्यांनी कलम 2 (i) ची परिभाषा सविस्तर विशद केली.
प्रश्न – कोर्टाने काय मत मांडले?
या केस मध्ये कोर्टाने सुप्रीमकोर्टा चे CIT विरुद्ध राजा बेनॉय कुमार साहास रॉय 32 ITR 466 याचे कारण मिमांश करून याचे आधार घेतले व सांगितले कि शेतीला लागणारी क्रिया याच्यात झाली नाही.
प्रश्न – शेवटी मद्रास हायकोर्टाने काय केले निर्णय दिले?
शेवटी मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही.एस.सीरपुरकर यांचे सहकारी जज एन. व्ही नागीरेड्डी यांचे म्हणणे चुकीचे आहे व शुटींगचे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न नाही असे निर्णय दिले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)