Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण शेतीच्या उत्पन्ना बद्दल बघत आहोत. इन्कमटॅक्स मध्ये आपण शेतीचे उत्पन्न दाखवतो व इन्कमटॅक्स कार्यालय त्याला मान्य करत नाही म्हणुन नेमके शेतीचे उत्पन्न म्हणजे कायद्यात काय ? या बद्दल आपण माहिती सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघत आहोत, जे वाचकांना उपयोगी ठराव.

प्रश्न- रामराव यांना शामराव कडून गाईचे कुरण वापरण्यापासून 2 लाख रु. फीस म्हणुन मिळतात. या मिळणाऱ्या पैशास शेतीचे उत्पन्न म्हण्टले जाईल का ? या वर इन्कमटॅक्स लागू शकतो का ? 
- कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध शमसेर जंग बहादूर या केस मध्ये असाच प्रश्न कोर्स समोर आला या केस मध्ये अलाहबाद हायकोर्टाने निर्णय दिला की शमसेर जंग बहादूर यांना मिळालेले पैसे हे शेतीचे उत्पन्न म्हणुन धरले जावे. या केसच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की रामराव यांना जे 2 लाख रु. गायी वासरूच्या म्हणजे जनावरांच्या कुरणा पासून मिळाले, ते शेतीचे उत्पन्न आहे व या 2 लाखावर इन्कमटॅक्स लागणार नाही. 

प्रश्न- आदित्य यांच्या शेतात मुसळधार पाऊस झाला व मुळे बर्फाचे ओले ही पडले. या मुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले व इन्शुरन्स कंपनी ने आदित्य यांना 5 लाख रु. दिले हे चहाचे मळे होते. या मिळालेल्या 5 लाखावर इन्कमटॅक्स लागेल का ? हे पैसे शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल का ? 
- याच प्रकारचा केस कलकत्ता हायकोर्ट समोर आला त्या प्रकरणात कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध बी.गुप्ता प्रायवेट लिमिटेड या केस मध्ये कलकत्ता हायकोर्टाने सांगितले कि मुसळधार पावसामुळे गुप्ताचे चहाचे बगीचे वाहून गेले. या प्रकरणात इन्शुरन्स कंपनी ने भरघोष नुकसान भरपाई दिली. या नुकसान भरपाईस इन्कमटॅक्स ऑफिसर यंनी टॅक्स लावले. हे प्रकरण कलकत्ता हायकोर्टात गेल्यानंतर कोर्टाने बी.गुप्ता इस्टेट यांचे टॅक्स माफ केले व इन्कमटॅक्स ऑफिसरच्या निर्णयास स्थगिती दिली. या केसच्या आधारे आपण म्हणू शकतो कि आदित्य यांना मिळालेल्या 5 लाख रु. वर इन्कमटॅक्स लागणार नाही.

अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.