Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर सर्वांच्या हितासाठी देत आहोत.

प्रश्न- सर , मला One Person Company ( वन परसन कंपनी ) सुरु करायची आहे त्या बद्दल मार्गदर्शन करावे. (विक्रांत कांबळे , ब्रहमपुरी ( जि- चंद्रपूर)
- तुमचा प्रश्न आजच्या बदलत्या काळात फार महत्वाचा आहे. याचे आपण खालील प्रश्नोत्तर रूपाने संक्षिप्त मध्ये बघणार आहोत, जे व्यवहारात सर्व वाचकांना उपयोगी ठरू शकते. याचे सविस्तर बघणे म्हणजे किमान चार - पाच लेख होतील. जे कधीतरी वेळ मिळाल्यास पुढे बघू.

प्रश्न- One Person Company ( वन परसन कंपनी ) म्हणजे नेमके काय ?- नावाप्रमाणे वन परसन कंपनी म्हणजे फक्त एक माणुस सदस्य असलेली कंपनी. यात एकच मेंबर असते आणि तेच मेंबर शेअर होल्डर असते. सोप्या भाषेत आपल्याला असे म्हणता येईल की एकच माणुस या कंपनीचा मालक, भागीदार व सर्वेसर्वा असतो. तोच एक माणुस कंपनीचा प्रोमोटर असतो. याला आपण येथे एका माणसाची कंपनी म्हणू या.

प्रश्न – एका माणसाची कंपनी बनवण्याची प्रोसीजर काय आहे ?
- याची प्रोसीजर संक्षिप्त मध्ये खालील प्रमाणे करता येईल. सर्वात आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन साठी खालील महत्त्वाचे पाउल उचलणे आवश्यक आहे.

१. सर्वात आधी DSC साठी अर्ज करून ते काढणे आवश्यक आहे.

२. या नंतर अर्ज करून DIN नंबर काढणे आवश्यक आहे.

३. एका माणसाच्या कंपनीचे नाव मंजुर करून मागवावे लागेल.

प्रश्न – DSC म्हणजे काय ?- यालाच डिजीटल सीग्नेचर सर्टिफिकेट म्हणतात. हे स्वाक्षरी चे प्रमाण पत्र कम्प्युटराइज असते. हे काढणे आवश्यक असते. सोप्याभाषेत याला डीजीटल स्वाक्षरी म्हणू शकतो.

प्रश्न – DIN म्हणजे काय ?- याला डायरेक्टर आयडेन्टिफीकेशन नंबर म्हणतात. या वरून डायरेक्टरची ओळख पटते. हे काढण्याची MCA(Ministry of Corporate Affirs) चा एक फॉर्म भरावा लागतो.

प्रश्न – वन परसन कंपनीचे नाव कुठून घ्यावे लागते ?- त्यासाठी रजिस्टा्र ऑफ कंपनी कडे अर्ज करावे लागते त्या बरोबर MOA, AOA, म्हणजे मेमोरँडम ऑफ असोसीएशन, आर्टीकल ऑफ असोसीएशन, ऑफीस चा कागदी पुरावा, डायरेक्टरची मान्यता कागद पूर्तता करावी लागते. या नंतर आपल्याला सर्टिफिकेट ऑफ इन्कॉरपोरेशन म्हणजे कंपनी मान्यता मिळते.

आपण हे सर्व संक्षिप्त मध्ये बघितले आहे. आपले प्रश्न कृपया वॉटसअप वरच विचारावे.