सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर सर्वांच्या हितासाठी देत आहोत.
प्रश्न- हाय सर, सर्वात आधी संध्यानंद द्वारे आपण अमुल्य मार्गदर्शन करत असता त्या बद्दल धन्यवाद! १६ ते १७ वर्षापूर्वी माझे पती अॅडवरटायझींग कंपनी मध्ये काम करीत होते. त्यांना पी. एफ. कापून पगार मिळत होता. ते काम सोडल्यानंतर माझ्या पतीने पी. एफ. रक्कम मिळण्यासाठी रीतसर अर्ज केला. तरी देखील नवीन कंपनी पी. एफ. कापत नाही व जुनी कंपनी आम्हाला पी. एफ. ची रक्कम देत नाही. जुन्या कंपनी कडून पी. एफ. रक्कम आम्हाला मिळू शकते का ? ( सुजाता पारते, सह्याद्री सोसायटी, जुनी मुंबई पुणे रोड, कलवा (जि.ठाणे)

- तुम्हाला तुमचे पी. एफ. चे सर्व जमा झालेले पैसे नक्की मिळतील. त्यासाठी तुम्हाला कायदेशीर अर्ज करावे लागेल. या साठी तुम्ही प्रत्यक्ष पी. एफ. ऑफीस मध्ये जाऊन कागदपत्राची पुर्तता करावी म्हणजे तुम्हाला तुमचे पी. एफ. चे पैसे लवकर मिळतील.
आपण आता शेतीच्या उत्पन्नाबद्दल बघत आहोत. ते नेहमी प्रमाणे सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघत आहोत.
प्रश्न- कबीर याने त्याच्या शेतात झाडांचे रिप्लॅन्टेशन केले म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा झाडे लावली. या रिप्लॅन्टेशन चे उत्पन्न शेतीचे उत्पन्न धरले जाईल का ?

- रिप्लॅन्टेशन म्हणजे जी झाडे आधी जगली नाही ती दुसऱ्यांदा लावण्यात आली व त्याचे उत्पन्न कबीरला मिळाले. याचे मिळालेले असे उत्पन्न कबीर चे उत्पन्न व ते ही शेतीचे उत्पन्न धरले जाईल. म्हणजेच याचाच संक्षिप्त परिणाम असा होईल की या उत्पन्नावर इन्कमटॅक्स कायद्याप्रमाणे इन्कमटॅक्स लागणार नाही किंवा ते शेतीचे उत्पन्न रेट साठी जोडले जाईल. याचे कारण असे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया यांनी कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध राजा बेनॉय कुमार सुहास रॉय या केस मध्ये स्पष्ट निर्णय दिले आहे की रिप्लॅन्टेशन झाडाचे झाले व त्याचे उत्पन्न मिळाले तर ते शेतीचे उत्पन्न धरले जाईल व त्याच्यावर इन्कमटॅक्स लागणार नाही.
सारांश मध्ये असे सांगता येईल की कबीर चे इन्कमटॅक्स मध्ये शेतीचे उत्पन्न धरले जाईल व त्या वर इन्कमटॅक्स लागणार नाही. इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत. कृपया आपले प्रश्न वॉटसएपवरच विचारावे.