Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण ज्या प्राप्तीवर इन्कमटॅक्स लागत नाही, या बद्दल सविस्तर बघत आहोत. यात सर्वात आधी येते ते Agricultural Income म्हणजे शेतीचे उत्पन्न. शेतीचे उत्पन्न म्हणजे नेमके काय? या बद्दल आपण प्रश्नोत्तर द्वारे सोप्या भाषेत बघणार आहोत.

प्रश्न – नमस्कार, तुमच्या लेख खूपच मार्गदर्शक आहे. मला हे विचाराचे होते की, माझे शेतीचे माल आले आहे परंतु इन्कमटॅक्स अधिकाऱ्याने माझे म्हणणे नाकारले मी काय करावे? (विनोद जोशी, अंधेरी) 
- तुम्ही तुमच्या माल विक्रीच्या पावत्या व ७/१२ (त्यावर पेरे टाकलेले असणे आवश्यक आहे.) दाखल करा. जर ७/१२ वर पेरे नसतील तर ती इन्कम शेतीची नाही असे म्हणू शकतात.

प्रश्न –शेतीचे उत्पन्न म्हणजे काय ? 
- शेतीचे उत्पन्न म्हणजे त्याच्यात बऱ्याच बाबी येतात. सर्वात आधी त्यात कोणतेही भाडे किंवा उत्पन्न जे भारतातील शेतीच्या जमिनीपासून होते त्यास शेतीचे उत्पन्न असे म्हणतात. याला आपण उदाहरणा द्वारे बघू.

प्रश्न–रामराव यांची जमीन महाराष्ट्रात आहे. त्यांना त्या जमिनीपासून वार्षिक दहा लाखाचे उत्पन्न आहे. हे उत्पन्न शेतीचे उत्पन्न होऊ शकते का ? या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागेल का? 
- महाराष्ट्रातील जमीन म्हणजेच हि जमीन भारतात आहे. या जमिनीपासून दहा लाख रु. वार्षिक उत्पन्न मिळते. हे उत्पन्न शेतीच्या जमिनीपासून असल्यामुळे या जमिनीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागणार नाही. म्हणजेच या दहा लाखावर इन्कमटॅक्स लागणार नाही. (याला काही अटी आहेत आपण हळूहळू सविस्तर बघू )

प्रश्न – शेतीच्याउत्पन्नावर शेतकऱ्याने उत्पन्न किंवाभाडे मिळविण्यासाठी लागणारा मार्केट खर्च केला असेल तर हे उत्पन्न शेतीचे धरले जाईल का? 
-होय, हे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणूनच गृहीत धरले जाईल. 

प्रश्न –शेतीचे उत्पन्न धरण्यासाठी ही जमीन नेमकी कुठे असावी, या बद्दल काही सुचनाकिंवानार्मस आहेत का ? 
- होय, या साठी ही जमीन भारतात असावी, तसेच ७/१२ वर पेरे टाकलेले असावे.

अधिक माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.