Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनाहितार्त देत आहोत.

प्रश्न - सर, मी फीजिक्स चा प्रोफेसर आहे . माझ्या ऑफिसच्या चुकी मुळे मी दोन लाखाच्या इन्कमटॅक्स च्या रिफंड ची वाट बघत आहे . माझ्या ऑफिस ने चुकून दुसऱ्या पॅन नंबर मध्ये पूर्वी टी.डी.एस. चुकून टाकला आहे. सर मला रिफंड मिळू शकतो का ? ( प्रो.सी.एच.भोसले. डीपाटॅमेन्ट ऑफ फिजिक्स शिवाजी युनिव्हर्सिटी, अतिग्रे, कोल्हापूर निवृत्ती नंतर - -संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे, कोल्हापूर)
सर, तुमचा प्रश्न महत्वाचा असुन असा प्रोब्लेम अनेक करदात्यांचा आहे .

या करिता तुम्हाला खालील गोष्टी करणे गरजेचे आहे .

सर्वात आधी तुमच्या मालकाला त्यांचे रिवाईज टी.डी.एस. रिटर्न बरोबर असलेली माहिती भरून फाईल करण्याचे सांगावे. जर तुमचे रिटर्न फाइल केलेले असेल तर तुम्हाला इन्कमटॅक्स रिफंड मिळू शकतो. समजा जर तुमचे स्वतचे इन्कमटॅक्स रिटर्न फाईल केलेले नसेल तर या साठी कलम ११९ (२) (ब) खाली कन्डोनेशन ऑफ डीले करून घ्यावे व नंतर रिफंड क्लेम करावे म्हणजे तुम्हाला जुने रिफंड मिळू शकते. आता आपण बघणार आहोत की अशा कोण कोणत्या बाबी आहेत की ज्या वर इन्कमटॅक्स लागत नाही किंवा कमी लागतो. आपण गेल्या वेळेस या बाबी ढोबळ मनाणे बघितल्या होत्या. या वेळेस या बाबी आपणा एक एक करून सविस्तर विवेचन करणार आहोत जे व्यवहारात उपयोगी ठरावे , हे विवेचन सोप्या भाषेत परंतु प्रश्नोत्तर रुपात बघणार आहोत

प्रश्न – शेतीच्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागतो का ?
शेतीच्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागत नाही मात्र एकूण उत्पन्नात रेट परपज साठी याला जोडले जाते . अनेक वेळा रेट परपज साठी शेतीच्या उत्पन्नाला जोडल्यामुळे करदात्याचे भरण्याचे इन्कमटॅक्स मध्ये वाढ होऊ शकते . कशा प्रकारे शेतीचे उत्पन्न जोडले जाऊ शकते किंवा कशा प्रकारे शेतीच्या उत्पन्नाची टृीटमेन्ट इन्कमटॅक्स मध्ये दिली जाऊ शकते याची सविस्तर माहिती आपण पुढील आठवड्यापासून बघणार आहोत