सध्या आपण शेतीच्या जमिनीबद्दल सविस्तर बघत आहोत. आपण व्यवहारात बघतो की करदाते शेतीचे उत्पन्न म्हणून इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करतात व इन्कमटॅक्स ऑफिसर याला मान्य करत नाही. परिणामी करदात्याला खूप टॅक्सभरावे लागते. या विषयावर चर्चा करून आपल्याला हे स्पष्ट लक्षात येईल की कोणती जमीन शेतीची धरले जाते व कोणती नाही. हे आपण सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघणार आहोत.
प्रश्न –अलीखान याने आपली जमीन शेती करण्यासाठी भाड्याने दिली (ठोक्याने दिली). या जमिनीचे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाऊ शकते का ?
प्रश्न –अलीखान याने आपली जमीन शेती करण्यासाठी भाड्याने दिली (ठोक्याने दिली). या जमिनीचे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाऊ शकते का ?
- राजामुस्तफाअलीखान विरुद्ध कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स या केस मध्ये कोर्टाने असा निकाल दिला की या जमिनीचे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न म्हणून धरावे. या मुळे वरील उदाहरणात शेती जमिनीपासून मिळालेले भाडे हे शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल.
प्रश्न –रामराव यांना फुलशेती पासून ५ लाख रु. उत्पन्न मिळाले. फुलशेतीचे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल का ?
प्रश्न –रामराव यांना फुलशेती पासून ५ लाख रु. उत्पन्न मिळाले. फुलशेतीचे उत्पन्न हे शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल का ?
- रामराव यांना फुलशेती पासून मिळालेले ५ लाख रु. हे शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल. याचाच अर्थ असा की रामराव यांना या ५ लाख रु. च्या उत्पन्नावर शेतीच्या उत्पन्नासारख्या इन्कमटॅक्स लागणार.
प्रश्न –महिंद्रराव यांनी त्यांचे भांडवल शेती मध्ये पार्टनरशिप मध्ये गुंतवले आहे. त्यांना त्यांच्याभांडवलावर व्याज मिळाले. ते व्याजाचे उत्पन्न कसे धरले जाईल?
प्रश्न –महिंद्रराव यांनी त्यांचे भांडवल शेती मध्ये पार्टनरशिप मध्ये गुंतवले आहे. त्यांना त्यांच्याभांडवलावर व्याज मिळाले. ते व्याजाचे उत्पन्न कसे धरले जाईल?
-महिंद्रराव यांना व्याजाचे म्हणून उत्पन्न जरी मिळाले तरी त्यांनी हे पैसे शेती मध्ये गुंतवले आहेत. त्यांची हि पार्टनरशिपआहे. म्हणूनहे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल व या मिळणाऱ्या उत्पन्नावर महेंद्रराव यांना इन्कमटॅक्स भरावे लागणार नाही. असा निर्णय कमिशनर ऑफइन्कमटॅक्स विरुद्ध एम. एल. महिंद्र १९७८ या केस मध्ये ११२ ITR ३२३ मध्ये गौहटी हायकोर्ट यांनी वरील निर्णय दिला आहे. त्यांनी म्हटले की येथे जरी व्याज शब्द असला तरी ते शेती पासून मिळालेले आहे.
इन्कमटॅक्सचीअधिकमाहितीआपण पुढच्याआठवड्यातबघणार आहोत.
इन्कमटॅक्सचीअधिकमाहितीआपण पुढच्याआठवड्यातबघणार आहोत.