Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर सर्वांच्या लाभासाठी देत आहोत.

प्रश्न- इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये सन 2018-19 मधील उत्पन्नासोबत पूर्वीच्या मालमत्ताही दर्शविणे आवश्यक असते का? पूर्वीच्या मालमत्ता शेतजमिनी वगैरे यापुर्विचे विवरण पत्रात दर्शविल्या असतील तर पुन्हा याच मालमत्ता चालू विवरण पत्रात दर्शविण्याचे प्रयोजन काय ?( विजय घुमारे,नि.सरकारी कर्मचारी, शहापूर,(जि.ठाणे) 
- तुमचा प्रश्न अत्यंत व्यावहारिक तथा फार चांगला आहे. इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये पूर्वीच्या मालमत्ते बाबतही किमती दर्शविणे आवश्यक आहे. याचे कारण असे की मधल्या एका वर्षात जर आपण काही मालमत्ता विकल्या असतील किंवा घेतल्या असतील तर त्याचे विवरण इन्कमटॅक्स खात्याला माहित पडणे आवश्यक असते. त्या आधारे इन्कमटॅक्स विभाग टॅक्स लावत असते. याला आपण खालील उदाहरणावरून स्पष्ट चर्चा करू. उदाहरणार्थ समजा 2018-19 मध्ये मिस्टर जॅकी यांची प्रॉपर्टी 2 कोटीची आहे. परंतु पूर्वीच्या 17-18 च्या इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये त्यांची प्रॉपर्टी 3 कोटीची होती. जर ही माहिती इन्कमटॅक्स मध्ये दिली नाही तर इन्कमटॅक्सला कळणार नाही की त्यांची प्रॉपर्टी पूर्वीच्या वर्षी पेक्षा 1 कोटीने कमी का झाली ही वस्तुस्तिथी इन्कमटॅक्स विभागाला बॅलेन्सशीट बघितल्या नंतरच कळेल की 17-18 या वर्षी पेक्षा 18-19 या वर्षी प्रॉपर्टी कमी आहे. या कमी दिसणाऱ्या प्रॉपर्टी वर ते तपास करू शकतात.जर ही 1 कोटीची मालमत्ता विकली गेली असेल तर मी जॅकी यांना त्या 1 कोटी वर दीर्घकालीन किंवा अदीर्घ कालीन म्हणजेच लॉंगटर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्टटर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

सोप्या भाषेत आपण असे समजून घेऊ शकतो की टॅक्सची चोरी पकडण्यासाठी इन्कमटॅक्स विभागाने ही माहिती देणे आवश्यक केले आहे. या मुळे दोन नंबरच्या व्यवहाराला किंवा प्रॉपर्टीला चेक बसू शकेल. आपण आता नेहमी प्रमाणे शेतीच्या उत्पन्ना बद्दल बघत आहोत.

प्रश्न- रामराव आणि शामराव यांची शेती मध्ये भागीदारी आहे. रामराव यांना या पार्टनरशिप मध्ये 1 लाख रु. भागीदारीचा हिस्सा मिळाला आहे. या भागीदारीच्या मिळालेल्या 1 लाख उत्पन्नाला शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल का ? ढोबळ मानाने हे उत्पन्न करमाफ राहील का ?
- रामराव यांना मिळालेल्या 1 लाखाच्या उत्पन्नावर इन्कमटॅक्स लागणार नाही. हे उत्पन्न शेतीचे उत्पन्न म्हणून धरले जाईल असाच निर्णय कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स विरुद्ध आर.एम.चिदंबरम पिल्लाई या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.