Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण २६AS बद्दल अधिक माहिती बघणार प्रश्नोत्तर स्वरुपात आहोत.

प्रश्न – २६ AS म्हणजे नेमके काय ? हा आपण कुठून मिळवू शकतो ? 
- २६ AS हा असा फॉर्म आहे जो आपल्याला हे कळवतो की आपला किती टी. डी. एस. कशावर व कोणी कपात केला आहे. सोप्या भाषेत याला असे म्हणूया की २६ AS वरून आयकर विभागाला व आपल्याला हे कळते की कोणी आपल्याला किती रुपये दिले, कशाबद्दल दिले व कपात केलेला टी. डी. एस. भरला आहे.

प्रश्न – हनुमान यांनी कैलासरावांना ५०,००० रु. कमीशन दिले व टी. डी. एस. कपात केले. कैलासरावांचे ५० लाखांचे बँकेत १०% प्रमाणे FD सुद्धा आहेत. या व्यवहारांचा व २६ AS चा काही संबंध आहे का ? 
- या व्यवहारांचा अर्थातच सरळ संबंध २६ AS शी आहे. हनुमान यांनी कपात केलेले टी. डी. एस. (५०,००० x १०% = ५०००) व FD वर मिळालेल्या व्याजावरचे टी. डी. एस. (५०,००,००० x १०% = ५,००,००० व्याज यावर १०% टी. डी. एस. म्हणजे ५,००,००० x १०% = ५०,०००) २६ AS वर दिसणार सोप्या भाषेत याला असेच म्हणूया की कैलासरावांच्या २६ AS वर ५०,००० + ५००० = ५५,००० टी. डी. एस. दिसणार व आयकर विभागाला ही माहिती असणार की कैलासरावांना ५०,००० कमिशन व ५,००,००० व्याज मिळाले आहे.

प्रश्न - टी. डी. एस. चे पैसे कपात केले की लगेच २६ AS वर दिसते की यासाठी काही करावे लागते ? 
- टी. डी. एस. कपात करून पैसे दिले की २६ AS वर दिसत नाही. ते दिसावे यासाठी कपात केलेले पैसे चलनाद्वारे बँकेत भरून टी. डी. एस. चे रिटर्न दाखल करावे लागते. हे रिटर्न दाखल करण्याच्या तिमाही तारखा व दाखल न करण्याचे किंवा उशिरा करण्याचे परिणाम आपण आधीच्या लेखात पहिले आहेच.

पुढच्या लेखात २६ AS वरील माहिती चुकीची असेल तर काय करावे, २६ AS वर टी. डी. एस. दिसत नसेल तर काय करावे, इत्यादी बघू.