Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स



आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी कोणीही शेवटच्या तारखेपर्यंतची वाट बघू नये त्यासाठी आत्तापासून पूर्व तयारीला लागावे. हि पूर्वतयारी कोणकोणत्या बाबतीत घ्यावी व कशी घ्यावी हे आपण प्रश्नोतर रुपात बघू.

प्रश्न - टी.डी.एस संबधित काय काळजी घ्यावी ?
- जर आपण खालील पैकी कोणत्या एखादा व्यवहार केला असेल तर ३१ मे या तारखेच्या आधी टी.डी.एस रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. ( याला अजून काही अटी सुद्धा आहेत ज्या आपण टी.डी.एस.च्या लेखात बघितले आहे.)
क्र.
व्यवहार
वार्षिक रु.
टी.डी.एस
कपात दर
१.
व्याज दिले असेल तर
५,००० किंवा जास्त
१० %
२.
कमिशन/ब्रोकरेज (दलाली) दिले असेल तर
१५,००० किंवा जास्त
५ %
३.
दुकानाचे भाडे दिले असेल तर
१,८०,००० किंवा जास्त
१० %
४.
अचलित संपत्ती विकत घेतली असेल तर
५० लाख किंवा जास्त
१ %
५.
प्रोफेशन फीस दिली असेल तर
३०,००० किंवा जास्त
१० %

इत्यादी



प्रश्न - टी.डी.एस वेळेत दाखल न केल्यास काय होईल ?
- वेळेत टी.डी.एस रिटर्न दाखल न केल्यास २०० प्रति दिवस दंड (पेनल्टी) लागते.
उदाहरणार्थ – रामरावांनी त्यांच्या सी.ए.ला ३१ मार्च रोजी ८०,००० फीस दिली. १० % हिशोबाने ८,००० टी.डी.एस कपात केले व सी.ए.ला ७२,००० चा चेक दिला. त्यांनी त्याचा टी.डी.एस रिटर्न ५ जून रोजी दाखल केला तर त्यांना ५ दिवसाचे २०० प्रति दिवसाप्रमाणे (५ x २००) १,००० रु दंड भरावा लागेल.

प्रश्न - या वर्षाची रिटर्न भरण्याची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे. आम्ही रिटर्न कधी भरू शकतो ?
- रिटर्न भरण्यासाठी आपण जरी तयार असू तरी आपण तोपर्यंत रिटर्न भरू शकत नाही जोपर्यंत आयकर विभाग रिटर्न भरण्याचे फॉर्म काढत नाही. आजपर्यंत या वर्षासाठी (२०१८-१९) आयकर विभागाने वेतनदारांसाठीचे फॉर्म रिलीज केले आहेत ते आपण लगेचच भरू शकतो.
आमच्या मते आपले आयकर रिटर्न ३१ मे नंतरच भरावे जेणेकरून जवळपास सर्वांचे टी.डी.एस रिटर्न भरून होऊन जातात. याने आपल्या २६ अ.स. (26 AS) फॉर्मवर आपले पूर्ण टी.डी.एस दिसते.
या २६ AS बद्दल यावर टी.डी.एस दिसत नसेल तर काय करावे, यावर टी.डी.एस दिसत असेल तर काय करावे लागते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत