आज आपण स. आयकर आयुक्त तथा इन्कमटॅक्स अधिकारी ज्याला ITO म्हणतात, यांचे अधिकार आणि कार्य बघणार आहोत.
प्रश्न – ITO किंवा DCIT किंवा ACIT यांचे अधिकार आणि कार्य काय काय आहेत ?

- १ ऑक्टोबर १९९८ पासुन खालील अधिकार यांना देण्यात आले आहेत.
1. निर्धारण करणे म्हणजे याला सोप्या भाषेत असे म्हणता येईल की इन्कमटॅक्सचे रिटर्न जे करदाते भरत असतात त्याचे असेस्मेंट करणे हे यांच्या हद्दीत असते. म्हणजेच असेस्मेंट करण्याचा अधिकार यांचा असतो. हे निर्धारण नियमित किंवा बेस्ट जजमेंट निर्धारण ही असु शकते.
यांचे दुसरे कार्य आहे कलम १३९ ए अनुसार परमंट अकांऊट नंबर करदात्यास देणे किंवा अलॅाट करणे. यांच तीसरे कार्य आहे प्रमुख सी .आय टी. कडून अप्रूवल घेऊन अकांऊट ऑडिट करून घेणे. चौथे कार्य आहे की जर एखाद्या करदात्याचे उत्पन्न इन्कमटॅक्स रिटर्न मध्ये घेण्याचे सुटले असेल तर ते जोडून त्याच्यावर कर निर्धारण करणे. पाचवा अधिकार आहे की काही चुका झाल्या असल्यास त्या सुधारुण घेणे. हा अधिकार कलम १५४ प्रमाणे देण्यात आला आहे. सहावा अधिकार आहे कलम १३१ किंवा १३३ प्रमाणे प्रसंगी दुकानावर जाऊन काही माहिती गोळा करणे किंवा पुरावे मागवणे. पुढचा कार्य आहे जर त्यांना वरून अधिकार दिला असेल तर कोणत्याही कंपनीचे सर्च किंवा सीझर म्हणजे धाडी टाकणे किंवा तपास करणे, कंपनीचे रजिस्टर तपासणे. आठवे कार्य आहे टी. डी.एस. संबंधीचे. कमी टी. डी.एस. करणे किंवा नील टी. डी.एस. ला मान्यता देणे. नववे कार्य आहे अग्रिम कर मागणे. दहावे कार्य आहे रिफंड काढुन करदात्यांना देणे आणि शेवटचे कार्य आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात ट्रान्सफर ऑफीसर म्हणुन कार्य पाहणे.
या प्रमाणे आपण बघू शकतो की दैनंदिन व्यवहारात इन्कमटॅक्स ऑफिसर यांनाही फार महत्वाचे अधिकार आहेत. सहसा पब्लिकशी कॅान्टॅक्ट मध्ये इन्कमटॅक्सचे वरील अधिकारीच जास्त करून व्यवहारात येतात.
इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.