सध्या आपण इन्कमटॅक्सच्या विविध मोठ्या ते लहाना पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कार्य बघत आहोत. आता पर्यंत आपण सीबीडीटी आणि डायरेक्टर जनरल चे अधिकार बघितले आहे. आता आपण त्यांचेच अधिकार पुढे बघत आहोत.
प्रश्न – डायरेक्टर जनरल किंवा संचालकाचे पुढील अधिकार कोण कोणते आहेत ?
प्रश्न – डायरेक्टर जनरल किंवा संचालकाचे पुढील अधिकार कोण कोणते आहेत ?
- मान्यता किंवा असेसमेन्ट चे चार वर्ष संपल्यानंतर केस कलम 151 (2) मध्ये रीओपनींग करायची असल्याचे अधिकार डायरेक्टर जनरल कडे आहे. इन्कमटॅक्सच्या अधिकाऱ्यांना कलम 226 (5) प्रमाणे करदात्याची प्रॉपर्टी विकून इन्कमटॅक्स वसुल करण्याचे अधिकार देण्याचा अधिकार डायरेक्टर जनरल कडे आहे. काही केसेस मध्ये करदात्याचे रिफन्ड रोखून ठेवण्याचे अधिकार आहेत. कलम 245 अनुसार विकत असेल व त्या बरोबर काही टॅक्स ड्यूज असेल तर रिफन्ड टॅक्स मध्ये अॅडजस्ट करण्याचे अधिकार यांना आहे. दुसरी अपील (सेकण्ड अपील) किंवा हायकोर्टला रेफरन्स करायचे अधिकार यांना आहे. इन्कमटॅक्स चा ऑर्डर रिवाइज म्हणजे दुरुस्त किंवा नवीन करायचे अधिकार यांना आहे. कलम 271 (k) प्रमाणे पेनाल्टी लावण्याचे अधिकार यांना आहे. पेनाल्टी कमी करण्याचे किंवा पेनाल्टी पूर्णपणे माफ करण्याचे अधिकार डायरेक्टर यांना आहे. प्रोव्हीडन्ट फंड चे मान्यता देणे किंवा करण्याचे ही अधिकार असुन शेवटचा महत्वाचा अधिकार खालील अधिकाऱ्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याचे अधिकार यांनाच आहे.
प्रश्न – कमिशनर अपील (आयुक्त) यांचे कार्य अधिकार आणि कार्य आहेत ?
प्रश्न – कमिशनर अपील (आयुक्त) यांचे कार्य अधिकार आणि कार्य आहेत ?
- माहिती मागवणे किंवा पुरावा बघणे हे अधिकार कलम 131 आणि 133 मध्ये दिलेले आहे. तसेच कंपनीज चे रजिस्टर तपासन्याचे अधिकार यांना आहे. कलम 245 अनुसार रिफन्ड हे टॅक्स ड्यूच्या समोर अॅडजस्ट करण्याचे अधिकार आहेत. अपील चे हियरिंग, डिसमिस चे विविध अधिकार कमिश्नर ऑफ अपील यांना आहे. आणि जिल्हा पातळीवरील करदात्यांना इन्कमटॅक्स अधिकारी ते कमिशनर पर्यंतच जास्त काम पडत असतात. छोट्या मोठ्या करदात्यांना एकदम वर पर्यंत जाण्याचे काम सहसा पडत नाहीत. एकदम मोठ्या करदात्यांनाच सहसा वर पर्यंत जाण्याचे काम क्वचितच पडते. तसेच यांचा शेवटचा अधिकार आहे पेनाल्टी लावणे इत्यादी.
आपण पुढील आठवड्यात सर्वसामान्य करदात्यांचे काम इन्कमटॅक्स अधिकारी किंवा अतिरिक्त आयुक्त सहसा यांच्या पर्यंतच पडतात. आपण इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्य पुढील आठवड्यात सविस्तर बघणार आहोत जे व्यवहारातही करदात्यांना उपयोगी ठरावे.