Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

प्रत्येक माणसास कधी ना कधी इन्कमटॅक्सची नोटीस येते आणि तो माणूस गांगरून जातो. त्याला समजत नाही की इन्कमटॅक्स कार्यालयात कुणास भेटावे. यासाठी इन्कमटॅक्स मध्ये कोण कोण अधिकारी असतात आणि त्यांची कार्ये काय ? हे आपण गेल्या आठवड्यापासून बघत आहोत. आजही आपण तोच विषय पुढे सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघणार आहोत.

प्रश्न – डायरेक्टर जनरल किंवा डायरेक्टर चे काय काय अधिकार तथा कार्य आहेत ? 

- डायरेक्टर जनरल किवा डायरेक्टर यांना सी.बी.डी.टी. यांनी लावुण दिलेले कार्य करण्याची जबाबदारी असते. त्यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे.त्यात कलम ११९ (२) अनुसार सर्वात पहिला अधिकार आहे की त्यांच्या खालील अधिकारऱ्यांना वेळोवेळी सुचना देणे होय. या नंतरचा दुसरा अधिकार आहे की एका अधिकाऱ्यापासुन केस दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर करायचे असल्याचे अधिकार डायरेक्टर जनरल कडे असतात. जर टॅक्स चोरी झाली असेल तर त्याचा तपास करणे किंवा छानबीन करणे हा बोर्ड ऑफ डायरेक्टर चा तिसरा अधिकार आहे. एखाद्या करदात्याकडे पुराव्यानिशी काही सापडल्यास त्या करदात्याकडे सर्च किंवा धाडी टाकण्याचे अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टर कडे आहे. त्याच प्रमाणे कुठलीही पुस्तके किंवा मालमत्ता तपासण्याचे ही अधिकार या बॉडी कडे आहे. कलम १३३ A खाली सर्व्हे सुद्धा ही बॉडी आदेश देऊ शकते. या शिवाय कुठल्याही प्रकारचा तपास करण्याचा त्यांचा शेवटचा अधिकार आहे. या अधिकाराअंतर्गत ते कोणत्याही इसमाची तपासणी करू शकतात.

प्रश्न – कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स म्हणजे CIT यांचे अधिकार आणि कार्य काय काय असतात ? 
सहसा कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स हा आपला एरियाचा प्रमुख अधिकारी असतो. इन्कमटॅक्स अॅडमिनीस्ट्रेशन चा हा प्रमुख असतो. सी.आय.टी. ला कायद्यान्वये काही विशेष अधिकार दिलेले आहेत जे प्रामुख्याने खालील प्रमाणे आहेत.

१. आजकाल ट्रस्ट किंवा चॅरीटेबल संस्थांना फार महत्व आलेले आहे. या ट्रस्टची इन्कमटॅक्सची कायदेशीर नोंदणी करण्याचे अधिकार सी.आय.टी. यांना आहे. कलम १२ AA अनुसार ट्रस्ट नोंदणी करणे आवश्यक असते.

याच प्रमाणे एन्यूइटी करार करणे हा अधिकार सी.आय.टी. चा असतो. इन्कमटॅक्स अधिकारी यांचे अपॉइन्टमेन्ट तथा त्यांना ज्युरीस्डीक्शन करणे हे तिसरे महत्वाचे कार्य सी.आय.टी. यांना करण्याचे अधिकार आहे. आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना सूचना देणे व कार्य सोपवने हे त्यांचे पाचवे महत्वाचे कार्य आहे. कलम १२७ अनुसार केसेस चे ट्रान्सफर करणे हा त्यांचा पाचवा अधिकार आहे. पुराव्यांचे तपास करून निर्णय घेणे हा सी.आय.टी. चा सहावा महत्वाचा अधिकार आहे. आपण सहसा बघतो की व्यापाऱ्यांकडे किंवा इंडस्ट्रीमध्ये इन्कमटॅक्स ची धाडी पडतात. या धाडींना कायद्यात सर्च एण्ड सीझर असे म्हणतात. या धाडींना व्यवस्थितत मॅनेज करण्याचे कार्य सी.आय.टी. यांना करण्याचे कायद्यान्वये अधिकार आहे. पुस्तकांची छाननी करणे हे त्यांचे महत्वाचे कार्य आहे. या प्रमाणे आज आपण सी.आय.टी. चे ९ अधिकार बघितले आहे. पुढील आठवड्यात राहिलेले आणखी सी.आय.टी. चे अधिकार आणि कार्य बघणार आहोत. त्या शिवाय कमिशनर ऑफ अपील यांचे कार्य आणि अधिकार बघणार आहोत ज्यामुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडल्याशिवाय राहणार नाही.