Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आता आर्थिक वर्ष 2018-19 चा मार्च एन्ड संपला असुन आता
नवीन आर्थिक वर्ष 2019-20 ची सुरुआत झाली आहे. वर्षाच्या सुरुवाती
पासुनच विशेष लक्ष दिल्यास इन्कमटॅक्स ची विना कारणची कटकट
करदात्याच्या मागे लागायची शक्यता कमी होईल. म्हणून आज पासून नवीन विषय घेत आहोत जे व्यवहारात करदात्यास माहित असणे उपयोगाचे ठरावे. आपण इन्कमटॅक्स ऑथोरिटीज बद्दल सविस्तर प्रश्नोत्तर रुपात परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत.

प्रश्न- इन्कमटॅक्स कायद्यात कोण कोण ऑथोरिटीज आहेत ?- इन्कमटॅक्स कायद्याच्या 1961 प्रमाणे कलम 116 मध्ये खालील
इन्कमटॅक्स ऑथोरिटीज बद्दल माहिती दिली आहे, जी खालील प्रमाणे आहे.आपण वरून खाली अधिकाराच्या डीसेन्डींग ऑर्डर प्रमाणे देत आहोत.

1. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यालाच व्यवहारात CBDT असे म्हण्टले जाते.

2a. प्रमुख डायरेक्टर जनरल ऑफ इन्कमटॅक्स (हा पद 1 जुन 2013 पासून आला आहे.)

2b. प्रिन्सिपाल चीफ कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स (हा पद सुद्धा 1 जुन 2013 पासून अस्तित्वात आला)

3a. डायरेक्टर जनरल ऑफ इन्कमटॅक्स DGIT.

3b. चीफ कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स CCIT.

4a. प्रिन्सिपाल डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

4b. प्रिन्सिपाल कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स.

5a. डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स DIT.

5b. कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स CIT.

5c. कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स (अपील) CIT (A)

6a. अतिरिक्त डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

6b. अतिरिक्त कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स.

6c. इन्कमटॅक्सचे अतिरिक्त आयुक्त (अपील).

7a. जॉईंट डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

7b. जॉईंट कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स.

8a. डेप्युटी डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

8b. डेप्युटी कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स.

8c. डेप्युटी कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स (अपील).

9a. असिस्टन्ट डायरेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

9b. असिस्टन्ट कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स.

10. इन्कमटॅक्स ऑफिसर ITO.

11. टॅक्स रीकवरी ऑफिसर TRO.

12. इन्स्पेक्टर ऑफ इन्कमटॅक्स.

मराठी शब्द व्यवहारात प्रचलित नाही या मुळे प्रचलित इन्कमटॅक्सचे इंग्रजी पद येथे देण्यात आले आहे.

प्रश्न - सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस म्हणजे काय? CBDT चे व्यवहारात काय काय अधिकार आहे ?- CBDT हे भारत सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणारी इन्कमटॅक्सची सर्वात मोठी ऑथोरिटी आहे. 1963 च्या सेंट्रल बोर्ड ऑफ रेवेन्यु ऍक्ट खाली याची निर्मिती करण्यात आली आहे. या बॉडीला सर्वात अधिक अधिकार आहेत.कलम 118 आणि 119 मध्ये काही महत्वाचे अधिकार दिले आहेत जे खालील प्रमाणे आहेत.
1. इन्कमटॅक्स,वेल्थ टॅक्स आणि गीफ्ट टॅक्स बद्दलच्या कायद्यात बदल करणे.

2. एका ऑथोरिटी चे अधिकार दुसऱ्या ऑथोरिटीस प्रदान करणे.

3. सरक्युलर किंवा सुचना काढणे.

4. वृतपत्रात प्रेस रिलीज देणे.

5.विविध ऑथोरिटीजना मंजुरी देणे किंवा काढणे हे अधिकार इन्कमटॅक्स,वेल्थ टॅक्स आणि गीफ्ट टॅक्स कायद्याच्या बाबतीत असतात.

इन्कमटॅक्सची अधिक माहिती त्यात डायरेक्टर जनरल म्हणजे काय?
त्यांचे अधिकार काय? कमीश्नर ऑफ इन्कमटॅक्स म्हणजे कोण? त्यांचे अधिकार काय असतात याची माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.