Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आपण गेल्या काही आठवड्यापासून मार्च एण्डींगच्या हिशेबाने आर्थिक वर्ष २०१८ – १९ च्या संदर्भात टॅक्स प्लानींग बद्दल बघत आहोत. आपण कलम ८० (सी) बद्दल ही अनेक बाबी बघीतल्या. गेल्यावेळेस रोख किती ठेवावी, स्टॅाक, ऋणको आणि धनको या बद्दल ही सविस्तर बघीतले. आज आपण दुसऱ्या लक्ष ठेवायच्या अनेक बाबीवर सोप्या भाषेत बघणार आहोत जे व्यवहारात उपयोगी आहे.

प्रश्न- फॉरेनचे ऋणको किंवा धनको असल्यास काय काळजी घ्यावी ?

आजकाल इम्पोर्ट – एक्सपोर्ट करणे ही सामान्य बाब झाली आहे. या मुळे विदेशी ऋणको किंवा धनको यांचे उगम झाल्यास नवल नाही. ३१ मार्च २०१९ रोजीचे एक्सचेंज री – व्हॅल्युएशन करण्यात यावे व त्या प्रमाणे आलेल्या रकमेची नोंद घेण्यात यावी. सोप्या भाषेत याला असे म्हणता येईल की ३१ मार्च ची करेन्सीची रक्कम घेऊन विदेशी ऋणको किंवा विदेशी धनको यांची रक्कम ठरविण्यात यावी म्हणजे कायद्याप्रमाणे काहीच चुक होणार नाही.

प्रश्न :- प्रोव्हीजन करणे म्हणजे नेमके काय ? हे कोणकोणत्या खर्चाच्या बाबतीत करण्यात यावे ?

प्रोव्हीजन करणे म्हणजे त्या बीलाची नोंद घेऊन अकाऊंटींग करणे होय. मार्च चे खर्चाचे बिल इतक्या लवकर येणार नाही म्हणून दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे तथा मागील सरासरी प्रमाणे योग्य अंदाज घेऊन प्रोव्हीजन करणे आवश्यक आहे.टेलिफोन, लाईट, भाडे ईत्यादी सर्व खर्च १२ महिन्याचे टाकलेले आहेत का ? याची शहनिशा करावी व नसल्यास १२ व्या महिन्याचे प्रोव्हिजन करण्यात यावे.

प्रश्न :- एफ. डी. बद्दल काय काळजी घ्यावी ?

बँकेत ठेवलेल्या फीक्स डीपॉझीट बद्दल व्याजाचे सर्टीफीकेट घ्यावे म्हणजे व्याजाची नोंद बुक्स ऑफ अकाऊंट मध्ये घेऊ शकता. व्याजाचे कॅल्कुलेशन एक्चूअल बेसीस Actual Basis द्वारे घ्यावे, हे लक्षात ठेवावे.

प्रश्न :- स्टॉक बद्दल काय करावे ?

आपल्या जवळील एक्चूअल स्टॉक Physically म्हणजे प्रत्यक्ष मोजावे म्हणजे त्यात चुका होणार नाही. त्यात कर ऑफ ट्रान्झेक्शन बद्दल काळजी घ्यावी.कट ऑफ ट्रान्झेक्शन म्हणजे नेमके काय ? याबद्दल गेल्या आठवड्यात आपण बघितले आहे.

प्रश्न :- अजुन काय महत्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात ?

जी. एस. टी. चे संपूर्ण व्यवहार पूर्ण झाले का नाही, याची काळजी घ्यावी. टी. डी. एस. बद्दल हे लक्षात ठेवावे, कर्मचार्याचे टी. डी. एस. वेळेत ईन्कमटॅक्स मध्ये जमा केले का ? याची काळजी घ्यावी, येणाऱ्या टी. डी. एस. ची फार्म 26AS व 16A मध्ये घ्यावे.

प्रत्यक्ष टॅक्स बद्दल विशेष काळजी घ्यावी.

एल. आई. सी. पी. पी. एफ., मेडीक्लेम हे ३१ मार्च पूर्वी भरणे गरजेचे आहे याची काळजी घ्यावी, याच्या पावत्या सांभाळून ठेवाव्या इन्कमटॅक्सची अधीक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.