आजचा रविवार व्यावहारिक दृष्ट्या मार्च 2019 चा शेवटचा रविवार असल्याचे मानल्यास वावगे ठरू नये. म्हणून पुढील येणाऱ्या रविवार पेक्षा ही आजचा रविवार करदात्यांसाठी महत्वाचा आहे. करदात्यांनी खालील महत्वाच्या गोष्टी कडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
प्रश्न- रोख रकमे बद्दल काय लक्ष द्यावे ?
- आपल्या कडील रोख रकम ही अवाजवी रोख रकम तर नाही ना ? याची पडताळणी करणे गरजेचे आहे. याचे कारण असेकी काही व्यापाऱ्यांचे व्यवहार बँकेचे जास्त असतात तरी पण कॅश बुक मध्ये रोख रकम लाखेत किंवा करोडोत असते जे व्यावहारिक रूपाने कोणास ही पटणारे नाही. मग इन्कमटॅक्स विभागाला कसे पटेल ? या साठी अवाजवी रोख रकम 31 मार्चला पुस्तकात ठेवु नये. जर तुमच्याकडे जास्त कॅश रकम असेल तर ही बँकेत जमा करावी म्हणजे इन्कमटॅक्सची कटकट मागे लागणार नाही.
प्रश्न- स्टॅाक बद्दल काय लक्ष देणे गरजेचे आहे ?
- स्टॅाक आणि खरेदी विक्रीचे संपुर्ण व्यवहार पूर्णचे पूर्ण खतावले गेले नसल्यास त्याची पूर्तता करण्यात यावी. कट ऑफ ट्रान्झेक्शन कडे लक्ष देणे गरजेचे आहे. कट ऑफ ट्रान्झेक्शन म्हणजे काय ? असा उपप्रश्न पडणे सहाजीकच आहे. कट ऑफ ट्रान्झेक्शन म्हणजे असा व्यवहार की स्टॅाक मध्ये माल आला परंतु खरेदी बिल अजुन आलेलेच नाही किंवा याचा उलट ही होऊ शकते. म्हणजे माल चे बिल आलेले आहे परंतु स्टॅाक मध्ये फिजिकल माल आलेले नाही. या व्यवहारास कट ऑफ ट्रान्झेक्शन असे म्हणतात.
प्रश्न- डेटर्स बद्दल काय काळजी घ्यायला पाहिजे ?
- व्यापारी दुकानदार उधारी वर माला विकतो व त्याचे पैसे यायचे बाकी असतात. अशा उधारीच्या व्यवहारास डेटर्स असे म्हणतात. डेटर्सचे कन्फरमेशन पत्र घेणे आवश्यक असते. जर असे कन्फरमेशन पत्र असल्यास दोघांच्या ही व्यवहारात कसलाच फरक येणार नाही. त्याचप्रमाणे काही डेटर्स म्हणजे उधाऱ्या वर्षानुवर्षे यायचे बाकी असल्यास त्याचे कारण ही शोधणे जरुरी आहे. खूप वर्षाची बाकी असल्यास त्याच्या वसुली साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरी पण वसुली होत नसेल तर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली गेली का ? हे बघावे म्हणजे त्यांना बॅड डेबीट्स ( Bad Debts ) म्हणून कायद्यात संबोधित करता येइल व त्या रकमेवर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मागता येइल.
प्रश्न- क्रेडीटर्स बद्दल काय करणे गरजेचे आहे ?
- ज्यांच्या कडून आपण उधारीवर माल विकत घेतो व त्यांना पैसे देणे बाकी राहतात त्यांना क्रेडीटर्स असे म्हण्टले जाते. क्रेडीटर्स चे कन्फरमेशन घेऊन ठेवावे म्हणजे 31 मार्चला दोघांच्या ही अकाउंट मध्ये काही फरक राहणार नाही. इन्कमटॅक्स मध्ये अजुन काय काय अॅडजेस्टमेन्ट करणे गरजेचे आहे. मार्च एन्ड ला अजुन काय लक्ष देणे गरजेचे आहे याची माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.