Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आता मार्च एण्ड जवळ येत आहे. आर्थिक वर्ष २०१८ – १९ साठी हा मार्च महिना टॅक्स प्लॅानींगसाठी नुसता महत्वाचाच नसून हा महिना म्हणजे शेवटचा चान्स आहे. आपण गेल्या काही आठवड्यापासून कलम ८० (सी) च्या गुंतवणूक व वजावटी बद्दल चर्चा करत आहोत. आपण आठवण म्हणून बघत आहोत की महत्वाचे काय काय बघितले. आता पर्यंत आपण कलम ८० (सी) मध्ये कोण कोणत्या २५ बाबी येतात. त्यात प्रामुख्याने हे हि बघितले की एल. आय. सी. चे हप्ते फॅमिलीमध्ये भरल्यास कोणास वजावट मिळते व कुणाला वजावट मिळणार नाही. आज आपण एल. आय. सी. व इतर उर्वरीत चर्चा करणार आहोत. ही चर्चा प्रश्नोत्तर रुपात परंतू सोप्या भाषेत राहणार आहे जी प्रत्येक करदात्यास व वाचकास व्यवहारात महत्वाची ठरावी, यात शंका नाही.

प्रश्न- आई - वडिलांनी जर मुलाचे एल. आय. सी. चे हप्ते भरले तर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळते, हे आपण बघितले. जर आई – वडिलांनी सुनेचे हप्ते भरले तर वजावट मिळेल का ?आई किंवा वडिलांनी आपल्या सुनेचे एल. आय. सी. प्रिमीयमचे हप्ते भरले तर आई – वडिलांनी म्हणजेच सासू – सासऱ्यांनी आपल्या सुनेचे हप्ते भरले तर त्यांना इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळणार नाही.

प्रश्न- आई – वडिलांनी आपल्या मुलीचे हप्ते भरले तर वजावट मिळेल का ?होय. आई – वडिलांना त्यांच्या इन्कमटॅक्स रीटर्न मध्ये वजावट मागता येईल.

प्रश्न- आई – वडिलांनी मुलीच्या हप्त्याची वाजवट मागितली परंतू इन्कमटॅक्स ऑफीसर यांनी नाकारली कारण मुलीचे लग्न झालेले आहे ?नाही. येथे इन्कमटॅक्स ऑफीसर बरोबर नाही कारण आई – वडील मुलीचे हप्ते भरू शकतात. मुलीचे लग्न झाले आहे. म्हणून मुलीचे भरलेले हप्त्याची वजावट इन्कमटॅक्स ऑफीसर नाकारू शकत नाही. आई – वडिलांना लग्न झालेल्या मुलीच्या हप्त्याची वजावट मिळेल.

प्रश्न- जावयाचे प्रिमीयमचे हप्ते भरल्यास वजावट मिळते का ? रामराव यांनी आपल्या जावयाचे प्रिमीयमचे हप्ते भरले जे इन्कमटॅक्स ऑफीसर ने वजावट देण्यास नाकारले म्हणजेच वजावट दिली नाही. इन्कमटॅक्स ऑफीसर म्हणतात की जावयाचे भरलेले पैसे वजावटीस पात्र नाही ? येथे आई – वडील बरोबर आहे की इन्कमटॅक्स ऑफीसर यांचे म्हणजे बरोबर आहे ?या केस मध्ये इन्कमटॅक्स ऑफीसर यांचे म्हणणे बरोबर आहे कारण की इन्कमटॅक्स कायद्यात जावयाचे प्रिमीयमचे हप्ते भरल्यास रामराव यांना वजावट मिळणार नाही.

प्रश्न- कैलासराव यांचा मुलगा रमेशराव ६० वर्षाचा आहे. कैलासराव यांनी आपल्या मुलाचे एल. आय. सी. चे हप्ते भरले आहे. इन्कमटॅक्स ऑफीसरने कैलासराव यांना वजावट देण्यास नाकारले. इन्कमटॅक्सचे म्हणने आहे की रमेशराव हा त्यांचा मुलगा ज्येष्ठ नागरीक आहे. म्हणून इतक्या मोठया वयाच्या मुलाची वजावट मिळणार नाही. येथे कोणाचे म्हणने बरोबर आहे ?येथे रामराव यांचे म्हणने बरोबर आहे कारण रमेशराव हा ज्येष्ठ नागरीक असला तरी त्यांचा मुलगा आहे. म्हणून रामराव यांना इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळेल. इन्कमटॅक्स कायद्याची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.