Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण कलम ८० (सी) च्या गुंतवणूकीबद्दल बघत आहोत. आपण आता पर्यंत बघितले की कलम ८० (सी) मध्ये काय काय बाबी समाविष्ट केल्या आहेत. गेल्या वेळेस आपण एल. आय. सी. मॅच्युरीटी बद्दल बघितले असुन आज एल. आय. सी. ची व इतर माहिती बघणार आहोत.

प्रश्न :- पत्नी व मुलाच्या नावाने एल. आय. सी. चे प्रिमीयम भरले तर त्याची वजावट मिळले का ?

होय. जर व्यक्ती ने आपल्या पत्नीचे किवां मुलाचे प्रिमीयम चे पैसे भरले तर त्या व्यक्तीला इन्कमटॅक्स च्या कलम ८० (सी) खाली वजावट मिळते. 

प्रश्न :- समजा पत्नी ने पतीचे एल. आय. सी. प्रिमीयम चे हप्ते भरले तर पत्नीला इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळते का ? 

होय. पत्नीने जर पतीचे पैसे भरले तर पत्नीला ही इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळू शकते. 

प्रश्न :- पतीने पत्नीचे पैसे भरले तर एल. आय. सी. प्रिमीयमची वजावट मिळते. तसेच जर पत्नीने पतीचे पैसे भरले तरी प्रिमीयमची वजावट मिळते. तसेच जर मुलाने वडिलाचे प्रिमीयमचे पैसे भरले तर मुलाला इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळते का ? 

बापाने मुलाचे प्रिमीयमचे पैसे भरले तर वजावट मिळते हे जरी खरे असले तरी मात्र जर मुलाने बापाचे प्रिमीयमचे पैसे भरले तर वजावट मिळणार नाही. 

प्रश्न :- मुलाने आईचे प्रिमीयमचे पैसे भरले तर इन्कमटॅक्स मध्ये कलम ८० (सी) खाली वजावट मिळते का ? 

नाही. जर मुलाने आपल्या आईचे प्रिमीयमचे पैसे भरले तर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळणार नाही. मात्र आईने मुलाचे पैसे भरले तर आईला इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळते. 

प्रश्न :- आजोबा किंवा आजीने आपल्या नातूचे पैसे भरले तर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळेल का ? 

आजी किवां आजोबाने आपल्या नातवाचे प्रिमीयमचे पैसे भरले तर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळणार नाही. 

प्रश्न :- नातवाने आजोबा किंवा आजीचे पैसे भरले तर इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळते का ? 

नाही. नातवाला आजोबा किंवा आजीच्या प्रिमीयम पेमेंटची वजावट इन्कमटॅक्समध्ये मिळणार नाही. 

प्रश्न :- टॅक्स प्लानींग साठी विम्याचे हप्ते कसे भरावे ? 

आजोबा – आजीने नातवाचे पैसे न भरता आपल्या मुलांचे पैसे भरावेत तथा त्यांच्या मुलाने पुन्हा यांच्या मुलामुलींचे पैसे भरावेत. म्हणजे इन्कमटॅक्स मध्ये वजावट मिळायला कायदेशीर अडचण येणार नाही. इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.