सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न :- मी तुमचा नियमित वाचक आहे. माझा एक प्रश्न असा आहे की एल. आय. सी. चे म्यच्युरीटी अमाऊंट आणि बोनस याच्यावर कलम १०(१० डी ) प्रमाणे इनकमटॅक्स माफ आहे का ? काही म्हणतात की टॅक्स माफ आहे तर काही म्हणतात की इनकमटॅक्स माफ नाही. तर काही म्हणतात की एल. आय. सी. चे हे आलेले पैसे जर पुन्हा गुतवले गेले तरच माफ आहे नाही तर टॅक्स भरावा लागेल ? मी एक सेन्ट्रल गव्हर्नमेंट कर्मचारी असुन सी.ए. कंपनी मध्ये पूर्वी २ वर्ष काम ही केले आहे. कृपया सविस्तर माहिती द्यावी.
(विजय कुलकर्णी, महेश अपार्टमेंट, बदलापूर (वेस्ट) , थाने.
तुमचा प्रश्न व्यव्हाराच्यादृष्टीकोनातून फारच उपयोगी आहे. अनेक करदाते असे समजतात की एल. आय. सी. ची संपूर्ण म्यच्युरिटी रक्कम नेहमीच टॅक्स फ्री असते. ही याच्या अनेक अटी असुन माहिती चुकीची आहे. याची संक्षिप्त माहिती वाचकांना सोप्या भाषेत खालील प्रमाणे देत आहोत. एल. आय. सी. चे पॉलीसी पूर्ण झाल्यावर जे बेसीक सम एश्युअर्ड तथा बोनस परत पॉलीसी होल्डर्सला मिळतात त्याला बोनस सह म्यच्युरिटी रक्कम असे म्हणतात. इन्कमटॅक्स च्या कलम 10(10 डी) या कलमा प्रमाणे एल. आय. सी. चे म्यच्युरिटी रक्कम व बोनस याच्यावर काही अपवाद सोडले तर इन्कमटॅक्स लागणार नाही. याचाच अर्थ असा की एल. आय. सी. च्या सर्वच्या सर्व म्यच्युरिटी रकम वर टॅक्स माफ नाही . डीसीज्ड व्यक्तीच्या आश्रीत व्यक्तीला काही केस मध्ये पैसे मिळतांना टॅक्स लागतो तसेच की मॅन इन्सुरन्स खाली म्यच्युरिटी रकम मिळल्यास इन्कमटॅक्स माफ नाही त्या रकमेवर ही टॅक्स लागतो. तसेच एल. आय. सी. ची कुठली ही म्यच्युरिटी रक्कम मिळाली असेल आणि ती मिळालेली रकमेची पॉलीसी १ एप्रिल २००३ नंतर ची घेतलेली असेल परंतु ३१ मार्च २०१२ ला किंवा ३१ मार्च २०१२ पूर्वीची पॉलीसी असेल तर त्या म्यच्युरिटी च्या पूर्ण रकमेवर इनकमटॅक्स लागतो परंतु यात एक अट अशी पण आहे की जे एल. आय. सी. चे प्रिमीयम भरले जातात ते सम अश्युअर्डच्या २० टक्क्यापेक्षा जास्त असल्यास टॅक्स भरावे लागेल.
यात अजून एक माहिती आहे आणि ती अशी की जर पॉलिसी ३१ मार्च २०१२ नंतर काढली असेल व त्याचे वार्षिक भरलेले प्रिमीयम १० टक्क्यापेक्षा कमी असावे. म्हणजे जर वार्षिक प्रिमीयम सम अश्युअर्डच्या १० टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा पॉलिसीवर मिळणाऱ्या म्यच्युरिटी रक्कम तथा बोनस वर इन्कमटॅक्स लागेल.
संक्षिप्त मध्ये सोप्या भाषेत एवढे सांगता येईल की आपण कलम १०(१० डी ) च्या भानगडीत न जाता एवढे लक्षात ठेवावे की व्यक्तीने जर रेगुलर एल. आय. सी. ची पॉलीसी काढलेली असेल तर वरील काही अपवाद सोडल्यास सहसा एल. आय. सी च्या म्यच्युरिटी रक्कम व बोनस यावर इनकमटॅक्स लागणार नाही. त्या रकमेला पुन्हा तुम्ही विचारल्या प्रमाणे री इनव्हेस्ट करण्याची गरज नाही. व्यवहाराच्या दृष्टीकोनातून एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नेहमी प्रमाणे इनकमटॅक्सची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.