Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज पासुन आपण कलम ८० (सी) खाली मिळणाऱ्या इन्कमटॅक्स च्या हिशेबाने गुंतवणुकी बद्दल सविस्तर बघणार आहोत. नेहमी प्रमाणे आपण सोप्या परंतु प्रश्नोत्तर रुपात ही माहिती बघणार आहोत जी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी इन्कमटॅक्स मध्ये व्यवहारात इन्कमटॅक्स रीटर्न भरतांना उपयोगी ठरावी.

प्रश्न- इन्कमटॅक्स कायद्यात टॅक्स वाचवण्यासाठी काही पर्याय आहेत का ? असल्यास ते कायदेशीर मार्ग कोणते ? -प्रत्येक टॅक्स पेयरला इन्कमटॅक्स कायदेशीररित्या त्याला वाचवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याला इन्कमटॅक्सच्या कायद्यात अनेक कलमा द्वारे वजावट मिळु शकते. टॅक्स पेयरला कलम ८० (सी) पासुन कलम ८० (यू) पर्यंत अनेक सवलती उपलब्ध आहेत. या सवलती वजावटीच्या रुपात उपलब्ध आहेत ज्या मुळे व्यवहारात इन्कमटॅक्स मध्ये सुट मिळते. या सर्व वजावटी मिळण्यासाठी कायद्यात आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणुक करणे आवश्यक आहे नसता ही गुंतवणुक वजावटीस पात्र ठरणार नाही. यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की चालु आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी करदात्यांना ३१ मार्च २०१९ पूर्वी कलम ८० (सी) ते कलम ८० (यु) मध्ये गुंतवणूक करावी लागेल. असे केल्यास त्यांना या कलमात वजावट मिळु शकते.

प्रश्न – इक्विटी शेअर्स घेतले तर इन्कमटॅक्स मध्ये काय वजावट मिळु शकते ?-जर व्यक्ती याने इन्डीविड्युअल व्यक्ती याने लिस्टेड इक्विटी शेअर्स मध्ये स्पेशल नोटीफाईड स्कीम खाली गुंतवणूक करायला पाहिजे. जर अशी नवीन शेअर्सची खरेदी करण्यात आली तर कलम ८० सीसीडी च्या अटी पूर्ण होतील व करदात्यास जेवढी रक्कम यात गुंतवली जाईल त्याच्या ५० टक्के वजावट मिळेल. या वजावटीची कमाल मर्यादा २५ हजार आहे. याचाच अर्थ सोप्या भाषेत असा की जी गुंतवणूक या शेअर्स मध्ये केली जाईल त्याच्या ५० टक्के किवां २५ हजार जे कमी असेल एवढी वजावट करदात्यास मिळेल.

प्रश्न – कलम ८० सीसीएफ ची वजावट काय आहे ? हि वजावट करदात्यास कधी मिळते ?-कलम ८० सीसीएफ हा करनिर्धारण वर्ष २०१२-१३ पासून आलेला आहे. या कलमाखाली २० हजार रुपया पर्यंत वजावट मिळू शकते. या वजावटीस पात्र होण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. यात महत्वाची अट अशी की हि गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चर बॉंड मध्ये केली पाहिजे. हे बॉंड भारत सरकार द्वारा नोटीफाईड म्हणजे मान्यता प्राप्त पाहिजे. आपण पुढील आठवड्यात कलम ८० (सी) ची महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत, जी व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावी.