सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत
प्रश्न – हेलो सर,
मी फायनानशीयल अॅडव्हायझर म्हणून पुण्यात काम करतो मला ही माहिती हवी की इंडीव्युजवल व्यक्तीला म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स मध्ये गुंतवणुक करून इन्कमटॅक्स मध्ये काय फायदा मिळतो ?
(राहुल रमेशराव खरवडे, नीयर- एम- मार्ट, वल्लभनगर, पुणे-411-018)

- आयकर कायद्यानुसार काही ठराविक गुंतवणुकीला कलम 80C अंतर्गत सूट मिळते. त्यापैकी एक म्हणजे आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स) होय. याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील आठवड्यापासून बघणारच आहोत. दुसरे म्हणजे इ.एल.एस.एस. (ELSS) (इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम) प्रकारात मोडणारे म्युच्युअल फंड सोप्या भाषेत असे म्हणता येइल की प्रत्येक म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीची सूट मिळणार नाही, सूट मिळण्यासाठी इ.एल.एस.एस. फंड मध्येच गुंतवणुक करावी लागेल. इ.एल.एस.एस. मध्ये केलेली गुंतवणुक ही 3 वर्षा पर्यंत विक्री करता येणार नाही. जर 3 वर्षाच्या आत विक्री केल्यास आधी मिळालेली वजावट परत उत्पन्न म्हणून ग्राह्य धरून त्यावर ही आयकर भरावा लागेल.
3 वर्षानंतर इ.एल.एस.एस. युनिट विक्री केल्यास त्याला सामान्य लॉन्ग टर्म म्युच्युअल फंड सारखे टॅक्स लावण्यात येइल. सोप्या भाषेत यालाच असे म्हणता येईल की 3 वर्षानंतर विक्री केलेल्या इ.एल.एस.एस. युनिटचा नफा 1 लाखापेक्षा जास्त गेला तर त्यावर 10% टॅक्स द्यावा लागेल. म्युच्युअल फंड वर लागणाऱ्या टॅक्स बद्दल आपण आधीच्या अंकात उदाहरणासह बघितलेले आहे.
प्रश्न – इ.एल.एस.एस. म्युच्युअल फंड चे प्रकार कोणकोणते आहेत ?-इ.एल.एस.एस. मध्येही सामान्य म्युच्युअल फंड प्रमाणे 2 प्रकार असतात, पहिला लाभांश (Dividend) दुसरा वाढीव (Growth). लाभांशामध्ये दोन प्रकार असतात, लाभांश पुननिर्वेश (Dividend Rinvestment) आणि लाभांश मिळत (Dividend Payout) लाभांश पुननिर्वेश या प्रकारात नफ्याचा जो आपला लाभांश असतो तो परत त्याच ए.एल.एस.एस मध्ये निवेश होतो.
लाभांश मिळत या प्रकारात म्युच्युअल फंड कंपनीच भागधारकाला लाभांश बँकेत देऊन देते. मग हे भागधारकाच्या मनावर आहे की ते पैसे बँकेतून काढून वापरून घ्यावे किंवा परत दुसरीकडे गुतंवणूक करण्यास वापरावे.