बेनामी व्यवहार कायद्याच्या माहितीची ही आपली शेवटची चर्चा असुन या पुढे आपण नवीन विषय चर्चेला घेणार आहोत. आता पर्यंत आपण बक्षिसात तथा बेनामी व्यवहार बक्षिसात काय फरक आहे, हे बघीतले आपण बेनामी व्यवहाराच्या अनेक बाजूंचा उहापोह केला भारतात सध्या किती कंपन्या अस्तित्वात असून किती कंपन्या बोगस असण्याचा सरकारी अंदाज ही बघितला बेनामी मालमत्ताचे तपास करण्यासाठी इन्कमटॅक्स विभागाने काय रचना व योजना केली आहे हे ही बघीतले. बेनामी व्यवहाराची माहिती देणाऱ्या इसमास 1 कोटी रु. पर्यंतचे अंतरीय बक्षीस कसे मिळु शकते ? हंगामी बक्षीस म्हणजे काय ? असे अनेक प्रश्नांचे उत्तर बघीतले आज आपण या बद्दलची जनरल व शेवटची माहितीचा उहापोह प्रशोत्तर रुपात करणार आहोत जे वाचकांना माहितीप्रद ठरावा.
प्रश्न – रामराव यांनी चार बेनामी मालमत्ते बद्दल माहिती दिली या चारीची बक्षीसाची रक्कम किती मिळेल ? चारींची किमत 100 कोटी आहे.
- या चार ही मालमत्तेची एकूण किंमत 100 कोटी आहे. परंतु प्रत्येक मालमत्तेची किंमत वेगळी दिली नाही ती वेगवेगळी माहिती असणे आवश्यक आहे कारण की बक्षीसाची हंगामी तथा अंतरीय या दोन्ही रकमा प्रत्येक मालमत्तेच्या किंमतीवर ठरवली जाते.
प्रश्न – समजा वरील प्रश्नात चार ही मालमत्तेची वेगवेगळी किंमत 25 कोटी रु. प्रत्येकी आहे. आता हंगामी बक्षीस कसे काढले जाईल ? - हंगामी बक्षीसाची मर्यादा 10 लाख रु. आहे ही मर्यादा प्रत्येक मालमत्तेसाठी आहे. इथे मालमत्ता 4 आहे या मुळे दहा लाख एका मालमत्तेचे असे चार मालमत्तेसाठी 40 लाख रु. हंगामी बक्षीस मिळु शते. याचे दुसरे गणितीय भाग असा आहे की मालमत्तेच्या 1% किंवा दहा लाख जे कमी आहे जे बक्षिसास पात्र आहे इथे 25 कोटीची प्रत्येक मालमत्ता आहे त्याचे 1% म्हणजे 25 लाख होतात म्हणुन प्रत्येकी 10 लाख हंगामी बक्षीस मिळु शकेल.
प्रश्न – वरील प्रश्नातच रामराव यांना अंतीम बक्षीस किती मिळु शकते ? गणितीय आधार कसा काढणार ? - अंतरीय बक्षीसाची रकम मालमत्तेच्या 5% एवढी असते येथे प्रत्येक मालमत्ता 25 कोटीची असून अशी 4 मालमत्ता आहे 25 कोटीची 5% म्हणजे 1.25 कोटी रु. प्रत्येक मालमत्तेसाठी पात्र ठरतात परंतु अंतरीय बक्षीसाची रकम 1 कोटी अधिकतम असल्या कारणाने प्रत्येकी 1 कोटी रु. मिळतील या प्रकारे 4 4 मालमत्तेच्या 4 कोटी रु. मिळतील. प्रत्येक मालक्मात्तेसाठी या प्रकारेच गणितीय कॅल्क्युलेशन काढावे लागणार.
प्रश्न – वरील उदाहरणात चार मालमत्तेचे हंगामी बक्षीस म्हणुन 40 लाख तथा अंतीम बक्षीस म्हणुन 4 कोटी असे एकूण 4 कोटी 40 लाख रु. माहिती देणाऱ्या इसमास मिळतील का ? - नाही. सुरुवातीला हंगामी बक्षिसाचे 40 लाख मिळतील नंतर अंतीम बक्षिसाच्या 4 कोटी मधून पूर्वी दिलेले 40 लाख रु. कमी करण्यात येईल म्हणजे 3 कोटी 60 लाख रु. दिले जाईल. एकूण हंगामी तथा अंतीम बक्षीस मिळून एका मालमत्तेचा 1 कोटी या प्रकारे 4 कोटी रु. मिळतील.
पुढील आठवड्यापासून इन्कमटॅक्सचा नवीन विषय बघणार आहोत.