सध्या आपण गेल्या अनेक आठवड्यापासून बेनामी व्यवहार कायद्या बद्दलची सविस्तर माहिती बघत आहोत. आता पर्यंत आपण बघीतले की बेनामी व्यवहार म्हणजे नेमके काय ? बेनामी व्यवहारात बेनामी मालमत्ताचे तपास करण्यासाठी इन्कमटॅक्स विभागाने काय योजना केली आहे ? आता पर्यंतच्या माहिती अनुसार या बेनामी व्यवहारात कोणा कोणाचा समावेश आहे ? बेनामी मालमत्ता दाखवणाऱ्या इसमास 1 कोटी रु. पर्यंतचे इनाम कसे व कधी मीळु शकते ? याची नेमकी पद्धत काय आहे ? एका पेक्षा जास्त म्हणजे अनेक बेनामी मालमत्ता असेल तर नेमके काय करावे लागेल ? माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव इन्कमटॅक्स विभाग गुप्त कधी ठेवते ? बेनामी व्यवहार करणाऱ्यास कायद्याने कोणती शिक्षा मिळु शकते ? हंगामी बक्षीस आणि अंतीम बक्षीस याच्यात काय फरक आहे ? बक्षीस मिळवण्याच्या अटी कोण कोणत्या आहेत ? बेनामी आणि बेहिशेबी मालमत्ता या मधील फरक ही बघीतला. आज आपण याची अधिक माहिती सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघणार आहोत.
प्रश्न - हंगामी बक्षीस मिळवण्यासाठी गणितीय गणित कशा प्रकारे काढले जाते ?
- हंगामी बक्षीस काढण्याची गणितीय पद्धत खालील प्रमाणे आहे . सर्वात आधी हे बघीतले जाते की मालमत्ता एक आहे का अनेक मालमत्ताची गोळा बेरीज आहे. समजा मालमत्ता एक आहे, असे आपण येथे सुरुवातीस ग्रहित धरू या मालमत्तेची मार्केट किंमत काढली जाईल. या स्कीम मध्ये सर्कल रेट बद्दल सांगीतले आहे. या मालमत्तेचा सर्कल रेट काढला जाईल. ही मालमत्ता बेनामी व्यवहार कायद्याच्या कलम 24 (4) खाली प्रोव्हिजनल अटॅचमेन्ट झालेली असावी. याला संबंधीत अधिकाऱ्याने मान्यता दिलेली असावी. या सर्व बाबी पुर्ण झाल्यानंतर मालमत्तेचा 1% पर्यंत हंगामी बक्षीस मिळु शकते. अशा इसमास या हंगामी बक्षीसासाठी पात्र धरले जाईल. याला कमाल बक्षीसाची एका मालमत्तेसाठीची मर्यादा 10 लाख राहील, हे पण येथे नमुद करणे महत्वाचे आहे.
प्रश्न – ही दहा लाख बक्षीसाची रकमची कमाल मर्यादा आहे का ?- होय, हंगामी इनामासाठी एका प्रॉपर्टीसाठी दहा लाखाची मर्यादा ठरवलेली आहे. ही मर्यादा फक्त टेम्पररी हंगामी बक्षिसासाठी आहे. ही मर्यादा शेवट पर्यंत नाही. शेवटची मर्यादा एक कोटी रु. आहे, ज्याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखात बघणार आहोत.
प्रश्न – जर चार बेनामी प्रॉपर्टी असेल तर चार हंगामी बक्षीस मिळु शकते का ?- होय, एका प्रॉपर्टीसाठी एक बक्षीस असे चार बक्षीस मिळु शकतात. याची अधिक माहिती ज्यात अंतरीय बक्षीस म्हणजे काय ? अंतरीय बक्षीसाची कमाल मर्यादा किती आहे ? अंतरीय व हंगामी बक्षिसाच्या गणितीय कॅल्क्युलेशन मध्ये काय फरक आहे ? याची माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत जी वाचकांना माहितीप्रद माहिती ठरावी.