Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे पत्र जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न – नमस्कार, मी संध्यानंद वर्तमान पत्रात या रविवारी तुमचा लेख वाचला. मला आवडला मला बेनामी आणि बेहिशेबी मालमत्ता या मधील फरक काय याची उदाहरणासह माहिती हवी होती....तुम्हास शक्य असेल तर ती महिती द्यावी......धन्यवाद. गणेश माळी, रा. कराड, (जि. सातारा)
- तुमचा प्रश्न व्यवहाराच्या दृष्टिकोणातून समजण्यास अत्यंत महत्वाचा आहे. बेनामी आणि बेहिशेबी याच्यातला मूलभूत फरकच आपण बघणार आहोत. याचे कारण असे की बेहिशेबी प्रॉपर्टी बेनामी असु शकते आणि बेनामी प्रॉपर्टी सुद्धा बेहिशेबी असु शकते. हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.
आपण आज बेहिशेबी आणि बेनामी मालमत्ता याचा महत्वाचा फरक बघत आहोत. बेनामी मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी एका व्यक्तीच्या नावाने असते परंतु त्याचे खरे पैसे दुसऱ्यानेच गुंतवलेले असते. याला उदाहरणासह असे म्हणता येइल की नरेंद्र याची मालमत्ता मुकेश यांच्या नावावर आहे. पैसे नरेंद्रचे आहे परंतु नाव मुकेशचा आहे. अशा वेळेस याला बेनामी व्यवहार म्हणतात कारण की पैसे एकाचे तथा नाव दुसऱ्याचे. आता आपण बेहिशेबी मालमत्ता बद्दल बघणार आहोत. बेहिशेबी मालमत्ता म्हणजे नावा प्रमाणेच याचे अर्थ असे की ज्याचा हिशेब लागत नाही, अशी मालमत्ता. सोप्या भाषेत याला असे म्हणता येइल की जी मालमत्ता इन्कमटॅक्स कायद्याच्या हिशेबात बसत नाही, अशी मालमत्ता याला आपण एक दोन सोपे उदाहरणासह बघु. समजा अमीत एक नोकरदार माणुस आहे. तो एक सरकारी अधिकारी आहे. त्याचा पगार 1 लाख रु. महिना आहे. तो गेल्या 15 वर्षा पासुन कामाला लागला आहे. त्याच्याकडे धाड पडली व त्याच्याकडे मालमत्ता ज्याच्यात फ्लॅट, सोना, चांदी, जमीन मालमत्ता सापडली ज्याची किंमत 25 कोटी रु. आहे. आता 15 वर्षाचे त्याचे पगार, त्याचा मासीक खर्च जाऊन 15 वर्षाची एकूण शिल्लक रकम काढली तर 25 कोटी रु. या आकड्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही या वरून त्याच्यावर केस दाखल होणे व वरील पैसा भ्रष्टाचाराने कमवला असे सिद्ध होऊ शकते. अमीतची ही अधिकची 25 कोटीची मालमत्ता बेहिशेबी समजली जाते व त्यास यथोचित शिक्षा होऊ शकते.

अजुन एक महत्वाचा प्रश्न असा की बेनामी मालमत्ता सुद्धा बेहिशेबी होऊ शकते आणि बेहिशेबी मालमत्ता सुद्धा बेनामी असु शकते हा इन्कमटॅक्स विभागाचा इन्वेस्टीगेशनचा भाग असतो. आपण या बद्दल मागे ओझरता विषय बघीतला आहे. इन्कमटॅक्स विषय समजण्यास क्लिष्ट असल्यामुळे आपण मधुन मधुन आता पर्यंत काय काय घेतले अशी आठवण रीविजन मध्ये देत असतो. पुढच्या आठवड्यात बेनामी व्यवहाराची अंतिम बक्षीसाची रकम ज्याला रिवार्ड म्हणतात, या बद्दल गणितीय भाग प्रश्नोत्तर मध्ये परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत जे व्यवहारात उपयोगी ठरावा.