आपण काळ्या पैशाची माहिती देणाऱ्याला 1 कोटी रुपये मिळणाऱ्या बक्षीसा बद्दल बोलत आहोत. याचे नियम बेनामी प्रतिबंधक कायद्यात दिले आहे. आपण बघीतले की बक्षीस दोन प्रकारे मिळु शकतात. यालाच हंगामी रीवार्ड आणि अंतीम रीवार्ड ही म्हणतात. हंगामी इनामा बद्दल आपण गेल्या आठवड्यात बघीतले. आज आपण फायनल रीवार्ड कशाप्रकारे मिळते याची माहिती बघणार आहोत जी सोप्या भाषेत आणि प्रश्नोत्तर रुपात आहेत.
प्रश्न – बेनामी प्रतिबंधक कायद्याखाली अंतीम इनाम मिळण्यासाठी किती अटी आहेत. - अंतीम इनाम म्हणजे फायनल रीवार्ड मिळण्यासाठी सहसा चार अटीची पुर्तता करावी लागते जी आपण खालील प्रशोत्तर रुपात सविस्तर बघणार आहोत.
प्रश्न – अंतीम इनामास पात्र होण्यासाठी बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्यात पहिली अट काय आहे ?- अंतीम इनामास म्हणजे फायनल रीवार्डसाठी पात्र होण्यासाठी सुचना देणाऱ्याने निश्चित माहिती देने आवश्यक आहे. त्या निश्चित माहिती मध्ये कोणती व कुठली मालमत्ता बेनामी आहे याचा सविस्तर उल्लेख येणे आवश्यक आहे. ती माहिती एनॅक्शचर ‘ए’ मध्ये देणे गरजेचे आहे आणि सूचना देणाऱ्यास इन्कमटॅक्स डिपार्टमेंट कडुन इन्फारमेन्ट कोड दिला गेला पाहीजे. हा एक सीक्रेट कोड असतो ज्यांची माहिती फक्त डिपार्टमेंटच्या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यास तथा सूचना देणाऱ्या या इसमासच माहिती असते.
प्रश्न – अंतीम इनामास पात्र होण्यासाठी दुसरी अट काय आहे ?- सूचना देणाऱ्या इसमासचे काम नुसते माहिती देऊन संपते असे नाही तर त्याने संपूर्ण मदत संबंधीत अतिरिक्त कमीशनर किंवा जॉईंट कमीशनर यांना केली पाहीजे. संबंधीत अधिकारी सुचना दिलेल्या मालमत्तेची संपूर्ण चौकशी करतील ज्यात सुचना देणाऱ्याला सहायता (मदत) करणे आवश्यक आहे.
प्रश्न – फायनल रीवार्ड मिळण्यासाठी तीसरी अट काय आहे ?- बेनामी प्रतिबंधक व्यवहाराखाली अंतीम इनाम मिळण्यासाठी संबंधीत बेनामी मालमत्तेची इन्कमटॅक्स विभागा द्वारा जप्ती झाली पाहीजे. ही जप्ती बेनामी प्रतिबंधक व्यवहार कायद्याच्या कलम 27 प्रमाणे झाली पाहीजे.
प्रश्न – अंतीम इनाम मिळण्यासाठी शेवटची व चौथी अट काय आहे ?- अंतीम इनाम सुचना देणाऱ्यास मिळण्यासाठी अंतीम अट अशी आहे की जप्ती अंतीम झाली पाहीजे आणि याचे जप्ती आदेश पास झाले पाहीजे. जप्ती आदेश झाल्यानंतर जर दोन वर्षा पर्यंत कुठलेच कायदेशीर अडचन आली नाही तर ही जप्ती अंतीम समजण्यात येइल. जप्ती आदेश पास झाल्यानंतरच्या दोन वर्षापर्यंत कुठलीच न्यायीक केस या मालमत्ते विरोधात नसावी म्हणजे सुचना देणाऱ्यास बिनदिक्कत पण नाव गुप्त ठेऊन त्याला अंतीम इनाम दिला जाइल.
पुढील आठवड्यात हंगामी बक्षीसाची रकम तथा अंतीम बक्षीसाची रकम कशी ठरवली जाते ? 1 कोटीची रकम कशी काढली जाते ? हंगामी बक्षीसाची रकम तथा अंतीम बक्षीसाची यांची 10 लाख तथा 1 कोटी ही मर्यादा कशी ठरवण्यात येते याचे गणीतीय कॅल्क्युलेशन कसे करतात? मालमत्तेच्या किती टक्क्या पर्यंत इनाम मिळु शकतो ? बेनामी मालमत्ता दोन किंवा जास्त ठीकानाची असेल तर इनाम कसा मिळतो अशी इन्कमटॅक्सची माहिती आपण बघणार असुन आपला हा विषय चर्चा बंद करून नंतर नवीन विषयाकडे वळणार आहेत. वाचकांना कुठला विषयाची माहिती पाहीजे ते ही आपण सुचवू शकता. हे विषय वैक्तिक नसुन सार्वजनीक असावे. ही सुचना फोन वर न करता मॅसेज द्वारा करावी. आपला प्रश्न पेपर मध्ये छापुन आला नाही तर पुन्हा डबल पाठवावे ही विनंती कारण वॉट्सअप मी रेग्युलर नेहमी बघत नाही.