Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याबद्दलची अधिक माहिती बघणार आहोत.

प्रश्न – १ कोटी पर्यंतचे बक्षीस बेनामी मालमत्तेची माहिती देणाऱ्यास कसे मिळू शकते ?
- बेनामी मालमत्तेची सूचना देणाऱ्यास दोन प्रकारे बक्षीस मिळू शकते.

प्रश्न - बक्षीस मिळण्याचे दोन प्रकार कोणते?- बक्षीस मिळण्याचा पहिला प्रकार म्हणजे हंगामी बक्षीस आणि दुसरा प्रकार म्हणजे अंतिम बक्षीस असे ढोबळ रित्या समजण्यास हरकत नाही. दोन्ही प्रकारचे बक्षीस मिळण्याच्या अटी मात्र इन्कमटॅक्स कायद्यात वेगवेगळ्या आहेत.

प्रश्न – बेनामी व्यवहाराची रीतसर सूचना देणाऱ्यास हंगामी बक्षीस मिळवायचे असल्यास त्यासाठी त्याला कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ?- इन्कमटॅक्स कायद्याच्या बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित नियमानुसार बेनामी व्यवहाराची रीतसर सूचना देणाऱ्यास खालील तीन अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१) सूचना देणाऱ्यानी बेनामी मालमत्तेची निश्चित माहिती जोड विभागात संबंधित इन्कमटॅक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास दिली पाहिजे आणि त्या निश्चित सूचना देणाऱ्या इसमास सूचना सांकेतिक कोड इन्कमटॅक्स विभागाकडून मिळाले पाहिजे आणि ते या स्कीममध्ये दिले गेले पाहिजे

२) दुसरी अट अशी आहे की संबंधित बेनामी मालमत्तेच्या इन्कमटॅक्स विभागाच्या अतिरिक्त कमिशनर किंवा संयुक्त कमिशनर यांना हवी असलेले पूर्ण सहकार्य या सूचना देणाऱ्यांनी केले असले पाहिजे.

३) तिसरी अट हंगामी बक्षीस मिळवण्याची हि आहे की हि बेनामी मालमत्ता या बेनामी प्रतिबंधक सुधारित कायद्याच्या कलम २४ (४) अनुसार तात्पुरती जप्ती झाली असली पाहिजे.

वरील या तिन्ही अटी पूर्ण झाल्याबरोबर सूचना देणाऱ्या व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींना हंगामी बक्षीस लगेच मिळू शकते.

इथुन पुढे आपण हे बघणार आहोत की. अंतीम बक्षीस या कायद्याखाली मिळवण्याच्या काय काय अटी आहेत. त्या किती प्रकारच्या अटी आहेत आपण हे ही बघणार आहोत की हंगामी बक्षीस किंवा अंतीम बक्षीसाची रक्कम किती मिळु शकते. ही रक्कम कशा प्रकारे या कायद्यात धरली जाते. हंगामी बक्षीस आणि अंतीम बक्षीस मिळण्याच्या व रकम काढण्याची नेमकी प्रोसीजर काय आहे ? सुचना देणारे अनेक व्यक्ती असेल म्हणजे एका पेक्षा जास्त व्यक्तीनी मिळुन बेनामी मालमत्तेची निश्चित माहिती दिली असेल तर प्रत्येकाला हंगामी किंवा अंतीम बक्षीस कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जाते ? अशा अनेक कायदेशीर परंतु व्यवहारात अत्यंत उपयोगी माहिती इथुन पुढील काही आठवड्यात वाचकांना वाचायला मिळेल.