सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत. आजचा वाचकांचा प्रश्न काळ्यापैशावर नसुन कलम 80 (डी) वर आधारीत आहे. या बद्दल सविस्तर प्रश्नोत्तर खाली देत आहोत, जे व्यवहारात अत्यंत माहितीप्रद व उपयोगी ठरेल.
प्रश्न – हॅलो सर, तुमचे संध्यानंद पेपर मधील इन्कमटॅक्स अँड इन्वेस्टमेन्ट लेख खूपच छान असतात. तुमची वाटसअप लींक माझ्या फोनवर पाठवावी माझा प्रश्न असा आहे की माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलीसी नसेल तरी मी इन्कमटॅक्सच्या कलम 80 डी खाली 50,000 रुपया पर्यन्त वजावट घेऊ शकतो, हे खरे आहे का ? कृपया सविस्तर कन्फर्म करावे. (प्रमोद कुळकर्णी, 1402, किंग्स्टन पॅलेस, चिंचोली बंदर रोड, मालाड (वेस्ट) मुंबई – ४०००६४)
- तुमचा प्रश्न खूप खूप महत्वाचा असुन पत्येक करदात्यास त्यातही विशेष करून वरिष्ठ नागरीकांना माहित होणे अत्यंत फायद्याचे व व्यवहारी प्रश्न आहे. हा प्रश्न इन्कमटॅक्सच्या कलम 80 डी साठी आहे. या कलमानुसार कलम 80 डी खाली इन्शुरन्स प्रीमीयमची वजावट मिळत असते, हा इन्कमटॅक्स कायद्याचा नियम आहे. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर बघु की जर इन्शुरन्स पॉलीसी नसेल तर मेडीकलच्या खर्चाची वजावट मिळते का ? याचे उत्तर खालील गोष्टीवर अवलंबुन आहे. तुमची इन्शुरन्स पॉलीसी नसतांना कलम 80 डी खालील वजावट घेण्यासाठी खालील मुद्दे विचारार्थ घेणे गरजेचे आहे. यात पहिला मुद्दा असा की ज्या व्यक्तीचे मेडीकल खर्च झाले आहे त्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे म्हणजे तो वरिष्ठ नागरिक असावा त्या संबंधीत वरिष्ठ नागरीकाची मेडीकल पॉलीसी नसावी. जर मेडीकल पॉलीसी असेल तर पॉलीसीचे प्रीमियम आणि वरिष्ठ नागरीकाचा मेडीकल खर्च पन्नास हजारापेक्षा जास्त असु नये. पूर्वी ही वजावट 30 हजार पर्यंतच होती व ही अतिवरिष्ठ नागरिकांनाच लागु होती. हा बदल नवीन कायद्यात चांगला झाला असुन या मुळे वरिष्ठ नागरिकांना सुद्धा याचा फायदा मिळेल जो पूर्वी मिळत नव्हता. पूर्वी हा फायदा घ्यायचा असल्यास संबंधीत व्यक्तीचे वय 80 पेक्षा जास्त असावे लागत होते. सारांश मध्ये एवढेच सांगता येइल की वरिष्ठ नागरिकांना कलम 80 डी खालील वजावट 50 हजार रुपया पर्यंत मिळु शकते ज्यात पॉलीसी घेण्याची गरजच नाही. हा बदल फार महत्वाचा असुन प्रत्येक करदात्यास माहित असने आवश्यक आहे म्हणून हा तुमचा प्रश्न नागरिकांच्या दृष्टिने फार महत्वाचा आहे, असे मला वाटते इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.