Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याबद्दलची माहिती बघत आहोत. काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी इन्कमटॅक्स विभाग सद्या काय काय नवीन फण्डे आणत आहे, या वर चर्चा चालु आहे. आपण नेहमी प्रमाणे हाच विषय सोप्या भाषेतील प्रश्नोतर रुपात बघणार आहोत. सध्या आपण काळ्या पैशाची माहिती देणाऱ्या इसमास १ कोटी रु इन्कमटॅक्स विभाग बक्षिस देणार आहे, याची चर्चा करीत आहोत.

प्रश्न – बेनामी मालमतेची माहिती देण्याची प्रोसीजर ( पद्दत ) काय आहे ? - ज्या मनुष्याला रीवार्ड ( इनाम ) पाहीजे त्याने स्पेसीफीक म्हणजे नेमकी माहिती इन्कमटॅक्स विभागाला देणे आवश्यक आहे. याची पध्दत खालील उप प्रश्नोत्तरामध्ये स्पष्ट होईल

प्रश्न – बेनामी मालमत्तेची माहिती कोणाकडे देणे आवश्यक आहे ? - ज्या ठिकाणी मालमत्ता आहे अशा ठीकाणच्या अधिकार क्षेत्रातील जॉइण्ट कमीशनर ऑफ इन्कमटॅक्स किवा अतिरिक्त कमीशनर ( बेनामी प्रोहीबिशन ) यांच्याकडे माहिती देणे आवश्यक आहे. यालाच JCIT/ Add. CIT ( BP ) असेही म्हण्टले जाते.

प्रश्न – संबंधीत अधिकाऱ्यांकडे माहिती दिल्यानंतर ते पुढे काय करतील ? - बेनामी मालमत्तेची माहिती संबंधीत इन्कमटॅक्स च्या अधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर ते माहिती निश्चित म्हणजे स्पेसिफिक आहे का ? याची खात्री करतील. नंतर ते एनेकजर ए ( Annexure A ) या फार्मचा एक सेट देतील. हा फार्म पूर्ण भरून त्याच्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीला स्वाक्षरी कराव्या लागतील. व तो फार्म JCIT / Add CIT ( BP ) यांच्या कडे सुपूर्द करावे लागेल.

प्रश्न – जर एका पेक्षा जास्त बेनामी मालमत्ता असेल तर काय करावे लागेल ? - जर एका पेक्षा जास्त बेनामी मालमत्ता असेल व त्या एकाच संबंधीत अधिकाऱ्याच्या अधिपत्या खाली असेल तर सर्व माहिती या संबंधीत एका अधिकाऱ्याकडेच सुपुर्द करावे लागेल 

प्रश्न – जर एखाद्या माणसाची मालमत्ता अनेक वेगवेगळया राज्यात असेल तर त्यासाठी माहिती कुणाकडे द्यावी लागेल? - याला आपण एका उदाहरणा द्वारे बघु समजा अनीलराव याची मोठी स्टील कंपनी आहे आणि त्याची मालमत्ता मुंबई, कोलकता, त्रिवेद्रम, दिल्ली तथा जयपूर येथे आहे. ही सर्व मालमता बेनामी आहे आणि त्याचाच कॉमपीटीटर सुनील स्टील यांना त्याची पूर्व कल्पना आहे. अशा वेळेस सुनील स्टील यांना त्यांच्या वैयक्तिक नावाने संबंधीत इन्कमटॅक्स अधिकाऱ्याकडे माहिती द्यावी लागेल म्हणजे त्याची योग्य दखल होईल व सुनीलराव यांना १ कोटी चे बक्षीस ही मिळेल.

प्रश्न – माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव इन्कमटॅक्स विभाग गुप्त ठेवते का ? - होय, इन्कमटॅक्स कायद्या प्रमाणे आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी जी रिवॉर्ड स्कीम आणली आहे त्याच्या ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रॅनजेकशन एकट १९८८ च्या बेनामी ट्रॅनजेकशन ( प्रॉहिबीशन ) अमेण्डमेन्ट एकट २०१६ च्या संशोधीत कायद्यानुसार माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवावे लागेल.

या संबंधीची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.