Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

गेल्या काही आठवड्यापासून आपण बेनामी व्यवहाराबाबतची माहिती बघत आहोत. आता पर्यंत आपण बघीतले की बेनामी व्यवहार कशाला म्हणतात. नातेवाइका मध्ये बेनामी व्यवहार होतो का ? बेनामी व्यवहाराची व्याप्ती नवीन सरकारने फार वाढवली याचे कारण काय ? बेनामी व्यवहाराची माहिती देणाऱ्यास 1 कोटी रुपया पर्यंतचे बक्षीस मिळु शकते अशा अनेक प्रकारच्या बाबी आपण बघीतल्या. आज आपण बेनामी व्यवहाराची नवीन माहिती प्रश्नोत्तर रुपी सोप्या भाषेत बघणार आहोत जे व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरू शकते.

प्रश्न – रीयल ओनर आणि बेनिफीशीयल ओनर म्हणजे नेमके काय ?- याचा डीक्शनरी अर्थ असा आहे की खरा मालक आणि फायदेशीर मालक. सोप्या भाषेत आपण याला असे म्हणु शकतो की वास्तविक मालक कोण आहे आणि ज्याला फायदा मिळणार आहे तो बेनिफीशीयल ओनर याला अजुन सोप्या दुसऱ्या भाषेत असे ही म्हणता येइल की ज्याचे खरे पैसे गुंतले तो खरा मालक आणि ज्याच्या नावाने आहे ज्याला याचा फायदा मिळणार आहे तो बेनिफीशीयल ओनर असे समजावे.

प्रश्न – जर एखादा व्यक्ती बेनामी प्रॉपर्टी मध्ये धरला गेला तर त्याचे ढोबळ परिणाम काय होणार ?
- कायद्याने बेनामी व्यवहाराला बंदी घातली आहे. त्याचे म्हत्वाचे परिणाम पुढील प्रमाणे आहे.

1) बेनामी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला सात वर्षा पर्यंतचा कारावास होऊ शकतो या शिवाय त्याला आर्थिक दंड ही लागु शकतो.

2) खोटी माहिती दिली म्हणून 5 वर्षा पर्यंतचा कारावास होऊ शकतो व त्याशिवाय आर्थिक दंड पन लागु शकतो.

3) बेनामी मालमत्तेस सरकार जप्त करू शकते आणि त्या बदल्यात नुकसान भरपाई सुद्धा मिळु शकत नाही. नंतर हा केस न्यायनिर्णायक अधिकार असलेल्या अधिकाऱ्याकडे वर्ग करू शकतात.

4) या नंतर न्यायनिर्णायक अधिकारी पुरावा तपासुन ऑर्डर पास करू शकतात.

5) या नंतर वरील प्रकरण अपीलीय ट्रिब्युनल कडे जाइल.

6) या पुढे ट्रिब्युनलचे निर्णय हायकोर्टात अपील मध्ये जाऊ शकतात एकंदरीत सोप्या भाषेत असे म्हणता येइल की बेनामी व्यवहार करणारा कायद्याच्या कचाट्यातून लवकर सुटु शकत नाही. त्याला 7 वर्षा पर्यंत कारावास व दंड होऊ शकतो.

2016 च्या सुधारित बेनामी व्यवहार कायद्यात पूर्वीचे काही दोष काढण्यात आले आहेत. नवीन संशोधीत कायद्यात 4 नवीन अधिकारी नेमण्यात आले आहे ज्यामुळे बेनामी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होणे सुलभ झाले आहे.

येणाऱ्या आठवड्यापासून आपण बघणार आहोत की बेनामी मालमत्ता धरण्यासाठी इन्कमटॅक्स विभागाने काय काय व्यूह रचना केली आहे ? त्यांचा एक्शन प्लॅन कसा असतो. कुठली प्रॉपर्टीला बेनामी प्रॉपर्टी व्यवहार समजले जात नाही असे अनेक प्रश्न सोप्या भाषेतील प्रश्नोत्तर रुपात बघणार आहोत जे व्यवहारात अत्यंत माहितीप्रद आहे.