Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण बेनामी व्यवहारा बद्दल माहिती बघत आहोत गेल्या वेळेस आपण बघीतले की बेनामी व्यवहार म्हणजे काय ? बेनामी व्यवहार करणाऱ्यास किती वर्ष कारावासाची व दंडाची व्यवस्था कायद्यात आहे ? बेनामी व्यवहाराची माहिती देणाऱ्यास 1 कोटी रुपया पर्यंत सरकार बक्षीस देऊ शकते. आज आपण या पुढील बेनामी व्यवहाराची माहिती बघणार आहोत, जी नेहमी प्रमाणे सोप्या प्रश्नोत्तर भाषेत आहे.

प्रश्न – शामराव यांनी आपली प्रॉपर्टी रामरावांच्या नावावर घेतली आहे. ही मालमत्ता शामरावांचीच असुन शामरावनेच हे पैसे दिले आहे. याला बेनामी प्रॉपर्टी म्हणता येइल का ? - होय, ही प्रॉपर्टी बेनामी प्रॉपर्टी समजली जाइल कारण की पैसे एकाचे असुन नाव दुसऱ्याचे आहे. या मुळे ही शामरावची मालमत्ता बेनामी समजली जाइल. येथे रामराव यांनी त्याचा नावाने घेतली तरी ही शामरावची प्रॉपर्टी असल्यामुळे ही प्रॉपर्टी बेनामी प्रॉपर्टीच धरली जाईल.

प्रश्न – वरील उदाहरणातच शामरावाने त्याची प्रॉपर्टी रामरावाच्या नावाने ठेवली ही बेनामी प्रॉपर्टी आहे का ? - होय, रामरावाने आपल्या नावाने केली काय आणि शामरावाने रामरावच्या नावाने केली काय ? दोन्ही मध्ये परिणाम सारखेच असल्यामुळे हा व्यवहार बेनामी व्यवहार धरला जाईल.

प्रश्न – समजा वरील उदाहरणात शामराव यांनी मालमत्ता रामरावाच्या नावाने केली होती परंतु रामराव यांनी ती मालमत्ता विकली व त्याची रोख रामराव कडे आहे परंतु आता मालमत्ता राहिली नाही. आता हे आलेले पैसे बेनामी व्यवहार मध्ये धरले जातात का ? - होय, या उदाहरणात रामराव यांनी मालमत्ता विकली व आता त्यांच्याकडे रोख रकम आहे बेनामी मालमत्ता राहिली नाही कारण त्यांनी ती विकली आहे. अशा प्रसंगी मालमत्ता विकुन जे पैसे रोख आले आहे, ते ही बेनामी व्यवहारातून कॅश आली असे धरले जाईल. सोप्याभाषेत असे म्हणता येइल की हा व्यवहार बेनामी आहे.

प्रश्न – मिस्टर रामराव यांनी त्यांच्या शामराव नावाच्या नातवाच्या नावाने मालमत्ता केली. पैसे ही रामरावाचे आहे परंतु त्यांनी नुस्ते शामच्या नावाने मालमत्ता हस्तांतरीत केली. आता हा व्यवहार बेनामी व्यवहार आहे का ? - नाही, या उदाहरणात हा व्यवहार बेनामी व्यवहार धरला जाणार नाही कारण येथे शाम हा रामरावांचा नातु आहे.

प्रश्न – बेनामी व्यवहार नातेवाइकात केले तरी ते बेनामी व्यवहार धरले जातील का ? - नातेवाइकाची येथे वेगळी परिभाषा दिलेली आहे. त्या परिभाषे प्रमाणे नातेवाइकात असा व्यवहार केल्यास बेनामी राहु शकतो परंतु फॅमीली मेंबर मध्ये असा व्यवहार केल्यास तो व्यवहार बेनामी व्यवहार धरला जाणार नाही. येथे नातेवाइक आणि फॅमीली मेंबर याच्यात फरक करण्यात आला असुन फॅमीली मेंबरची ही येथे वेगळी परिभाषा देण्यात आलेली आहे. बेनामी व्यवहाराची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.