Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आता पर्यन्त आपण बघीतले की बक्षीसावर इन्कमटॅक्स कधी लागतो व कधी लागत नाही. आपण महत्वाच्या नातेवाइका बद्दल ची माहिती बघीतली. आज आपण बघणार आहोत की मृत्यु समोर आहे व त्या मुळे बक्षीस दिले तर इन्कमटॅक्स लागणार किंवा नाही? हे प्रश्नोतर रुपात बघणार आहोत.

प्रश्न – अरुणराव यांनी आपली जंगम मालमता आपला मृत्यु समोर असल्यामुळे वरुण यांच्या नावाने केले. येथे इन्कमटॅक्स लागेल का?- अरुणराव यांना आपली मृत्यु समोर दिसत आहे. हे त्यांनी मृत्युपत्रा द्वारे हस्तांतरण करता येवु शकते या मुळे मृत्यु समोर आहे अशा वेळी हस्तांतरण केलेल्या जंगम मालमत्तेवर इन्कमटॅक्स लागणार नाही. ही मालमता अशी जंगम मालमता असावी की जी ‘ वील ’ द्वारे म्हणजे मृत्युपत्रा द्वारे हस्तांतरण करता येऊ शकते.

प्रश्न – वरील उदाहरणात जर अरुणराव यांना असे वाटले की ते आता मृत्युच्या जवळ आहे म्हणून जंगम मालमता दुसऱ्याला देत आहे त्यात त्यांचा मृत्यु झाला तर टॅक्स लागतो का? - नाही जर अरुणराव यांनी जंगम मालमता दिली व त्यांचा मृत्यु झाला तर दिलेल्या जंगम मालमतेवर टॅक्स लागणार नाही

प्रश्न – समजा अरुणराव यांनी आजाराला कंटाळुन मृत्युसमोर समजुन बक्षीस दिले परन्तु नंतर त्यांची तब्येत ठणठणीत झाली. तर नंतर ही जंगम मालमता कोणाची राहील ? या वर इन्कमटॅक्स लागतो का ?- हे उदाहरण थोडे वेगळे आहे. मृत्युला समोर समजुन बक्षीस देण्यात आले असे समजु परंतु नंतर तब्येत एकदम ठवठणीत झाली. व्यवहारात असे उदाहरण आपण अनेकदा बघतो यात काही नवीन नाही. परन्तु प्रश्न असा आहे की दिलेल्या बक्षीसाचे काय होईल. तर येथे स्पष्ट समजण्यास हरकत नाही की जर तब्येत ठणठणीत झाली तर ती मालमता पुन्हा देणाऱ्याचीच होईल. घेणाऱ्याला ती आता मिळणार नाही कारण की देणाऱ्याची तब्येत एकदम ठणठणीत झाली असुन आता ते मृत्युशय्याबाहेर आलेले आहेत.

प्रश्न – वरील उदाहरणात अरुणराव मृत्युशय्यावर असतांना जंगम मालमता दिली परंतु नंतर ते मृत्यु पावले. अशा वेळी वरुणराव यास मालमता मिळाली त्यांना टॅक्स लागेल का ?- नाही घेणाऱ्यास अशावेळी इन्कमटॅक्स लागणार नाही.


पुढच्या आठवड्यापासुन बेनामी व्यवहार आपण नेहमी हा शब्द ऐकतो परंतु नेमके बेनामी म्हणजे कायद्यात काय समजावे ? दोन नंबरच्या बेनामी व्यवहाराबाबत माहिती देणाऱ्यास सरकार इनाम देते का ? हा इनाम एक कोटी रुपया पर्यन्त असु शकतो का ? माहिती देणाऱ्याचे नाव गुपीत ठेवले जाते का ? या बद्दल

इन्कमटॅक्स कायदा काय म्हणतो याची अद्यावत माहिती जी व्यवहारात अत्यंत माहितीप्रद आहे ती पुढील आठवडयापासुन एक एक करून बघणार आहोत.