Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण बक्षीसा बद्दल सविस्तर चर्चा करीत आहोत. हा एक मोठा शस्त्र असुन याच कलमाखाली करदाते एकीकडे आपले इन्कमटॅक्स वाचवु शकतात तर याच कलमाखाली इन्कमटॅक्स अधिकारी पाहीजे तेवढा टॅक्स करदात्याकडून वसुल ही करू शकतात. म्हणून व्यवहार करतांना व्यवहारात या बद्दलची स्पष्ट माहिती असणे कधी ही चांगले. आज आपण नातेवाईकां बद्दल थोडी अधिक माहिती बघणार आहोत. आपण पूर्वी बघीतले की मीत्रांना बक्षीस दिले तर इतर उत्पन्नात जोडुन टॅक्स लागु शकतो परंतु नातेवाईकास बक्षीस दिल्यास टॅक्स लागणार नाही.

प्रश्न - इन्कमटॅक्स कायद्यात नातेवाईक (रीलेटीव) म्हणजे कोण कोण नातेवाईक येतात ? व्यक्तीची बायको किंवा नवरा नातेवाईक आहे का ? - व्यक्ती जर करदाता असेल तर त्याचे नातेवाईक म्हणून सोबत रूपाने खालील व्यक्ती येऊ शकतात. व्यक्तीची बायको जर शामराव स्वतः करदाता असेल तर त्याची पत्नी ही रीलेटीवच्या परिभाषेत येते. परंतु जर करदाता ही महिला असेल तर तीचा पती सुद्धा रीलेटीव या व्याख्येत बसतो. यालाच इन्कमटॅक्सच्या भाषेत पती किंवा पत्नी म्हणजेच ‘स्पाऊस’ spouse असे संबोधले जाते.

प्रश्न - भाऊ किंवा बहीण नातेवाईक आहेत काय ?- होय, व्यक्तीचे भाऊ किंवा बहीन हे ‘रीलेटीव’ म्हणजेच नातेवाईकाच्या परिभाषेत येतात. येथे जर करदाता पुरुष असेल तर त्याचे भाऊ बहीन व्याख्येत येतील. जर करदाता महिला असेल तर तीचे भाऊ-बहीन सुद्धा नातेवाईकाच्या परिभाषेत येतात.

प्रश्न - बायकोचा भाऊ नातेवाईक आहे काय ? नवऱ्याचा भाऊ नातेवाईक होतो काय ?
- करदाता हा स्वतः पुरुष असेल तर इन्कमटॅक्स कायद्यात त्याचा मेव्हणा म्हणजेच बायकोचा भाऊ हा नातेवाईक या परिभाषेत येतो. बायकोचा मोठा भाऊ किंवा बायकोपेक्षा वयाने लहान असलेला भाऊ सुद्धा नातेवाईक म्हणून इन्कमटॅक्स कायद्यात धरला जातो. इतकेच नव्हे तर बायकोची बहीन म्हणजेच ‘मेहोनी’ ही पण इन्कमटॅक्स कायद्याच्या ‘नातेवाईक’ या परिभाषेत धरली जाते. बायकोपेक्षा मोठी बहीन असो किंवा बायकोपेक्षा वयाने लहान बहीन जरी असली तरी ती ‘नातेवाईक’ या इन्कमटॅक्सच्या परिभाषेत येते. याच प्रमाणे जर करदाता ही महिला असेल तर तीचे दीर किंवा भाया हे नातेवाईक या परिभाषेत येतात. तसेच करदाता महिलेचे पतीचे भाऊ व बाहिनी इन्कमटॅक्सच्या ‘रीलेटीव’ च्या भाषेत मोडतात. पुढच्या रविवारी अजुन राहिलेल्या नातेवाईकांची यादी बघणार आहोत जे व्यवहारात सुद्धा अत्यंत उपयोगी आहे.