Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज आपण नेहमी प्रमाणे प्रश्नोत्तर रूपात सोप्या बोली भाषेत इन्कमटॅक्स बघणार आहोत ज्या मुळे वाचकांना प्रॅक्टीकल व्यवहारात खूप - खूप माहिती मिळु शकते. त्या आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - सर, प्रॉपर्टी 21/06/2010 ला खरेदी केली. त्यावर स्टॅम्प ड्यूटी लागली नंतर 23/08/2017 ला ती विकण्यात आली. कॅपीटल गेन लागेल का?
(एस. रमाकांत, डोंबीवली, मुंबई) 

- होय, कॅपीटल गेन लागेल. इंडेक्सेशन करून विक्री किमती मधुन कॉस्ट आणि स्टॅम्प ड्यूटी वजा करून जी रकम येइल त्यावर लॉंग टर्म कॅपीटल गेन लागेल.

प्रश्न - रामराव यांनी स्वतःचा मुलगा श्याम याला 5 लाख रु. बक्षीस म्हणून दिले. या वर इन्कमटॅक्स लागेल का ? श्यामच्या इतर उत्पन्नात हे 5 लाख रु. जोडले जातील का ? 

- येथे रामराव यांनी श्याम याला बक्षीस म्हणून 5 लाख दिले. श्याम हा रामरावचा मुलगा आहे. इन्कमटॅक्स कायद्या प्रमाणे 'रीलेटीव' म्हणजे नातेवाइकांना बक्षीस दिल्यास इन्कमटॅक्स लागणार नाही, असे नमुद केलेले आहे. श्याम हा 'रीलेटीव' च्या परिभाषेत येतो या मुळे श्यामला या वर इन्कमटॅक्स द्यावे लागणार नाही, हे महत्वाचे आहे. सोप्या भाषेत याचाच अर्थ असा की श्यामच्या इतर उत्पन्नात हे 5 लाख रु. जोडले जाणार नाही.

प्रश्न - फर्नांडीस यांनी मित्राच्या मुलाला १ लाख रु. बक्षीस म्हणून भेट दिले, रामराव फर्नांडीस यांचे मित्र असुन श्याम त्यांचा मुलगा आहे ? श्यामयाला इन्कमटॅक्स कायदा प्रमाणे टॅक्स लागेल का ?
- या उदाहरणात थोडा फरक आहे. येथे फर्नांडीस हे रामरावचे मित्र आहे. त्यांनी मित्राच्या मुलाला 1 लाख रु. बक्षीस दिले. याचाच अर्थ असा की श्याम हा कायदा प्रमाणे फर्नांडीसचा नातेवाईक नाही म्हणून तो 'रीलेटीव' च्या परिभाषेत येत नाही. या मुळे श्यामला येथे इन्कमटॅक्स कायद्या प्रमाणे या 1 लाखावर टॅक्स भरावा लागेल.

प्रश्न - वरील उदाहरणात समजा फर्नांडीस यांनी मित्र रामराव यांचा मुलगा श्यामला श्यामच्या लग्नानीमित्त 1 लाख रु.बक्षीस देत असेल तर या बक्षीसाला इन्कमटॅक्स लागेल का ?
- येथे सुद्धा संपूर्ण मागचेच उदाहरण आहे. फक्त फरक एवढेच आहे की मित्राच्या मुलाच्या लग्न प्रसंगी दुसरा मित्र बक्षीस देत आहे. अशा प्रसंगी श्यामला इन्कमटॅक्स लागणार नाही कारण लग्नाचे निमित आहे. लग्न प्रसंगी मिळालेल्या बक्षीसावर इन्कमटॅक्स कायद्या प्रमाणे इन्कमटॅक्स माफ आहे हे लक्षात ठेवावे लागते, म्हणून टॅक्स लागणार नाही. याची अधिक माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.