Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकाचे प्रश्न देत आहोत 

दि.२6 ऑगस्ट 2018 च्या संध्यानंद मध्ये रोबोटिक ऑडीट बद्दल तुमचा लेख वाचला माझा प्रश्न असा आहे की कॉर्पोरेशन किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असे ऑडीट करणे शक्य होईल का ? रोबोटिक ऑडीटचा फायदा काय ?
( नितीन देवराव नेरकर पत्रकार, क्राइम ‌संध्या, क्राईम रिपोर्टर वसई जि .पालघर )

कॉर्पोरेशन किंवा राज्यसरकार भविष्यात रोबोटीक ऑडीट द्वारेही ऑडीट करू शकतील, यात शंका नाही. अजुन ही कल्पना भारतात नवीन आहे. रोबोटीक ऑडीटचा फायदा असा होऊ शकतो की मानवी हस्तक्षेप राहणार नाही. या मुळे भ्रष्टाचाराला वाव एकदम कमी होइल किंवा राहणारही नाही. जनतेला किंवा संबंधित अधिकाऱ्याला संस्थे मध्ये नेमके काय चालले, याची स्पष्ट कल्पना येइल. फ्रॉड किंवा फसवणुकीचे प्रकार एकदम कमी होतील.

आता आपण नेहमी प्रमाणे ब्लॅक मनी काय ? गिफ्ट बद्दलची सविस्तर माहिती प्रश्नोतर रुपात बघत आहोत. आज पुन्हा याच विषयावर इन्कमटॅक्स कायदानुसार काय अडचणी येऊ शकतात.

प्रश्न – हरीश यांने कुशल यांच्या बरोबर एक विक्री करार केला आहे. त्याने एक मुंबई येथील फ्लॅट 75 लाखाला विकले आहे. या फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी किंमत 1 कोटी आहे. हरीशने विचार केला की कुशल त्याचा मित्र आहे आणि नेहमी तो हरीशचा फायदा करत असतो यासाठी त्याने फ्लॅट 75 लाखाला देऊ केला. इन्कमटॅक्स ऑफिसर यांच्या नजरेस हा व्यवहार पडला. ऑफीसरने हा व्यवहार इन्कमटॅक्स डीपार्टमेन्टला फसवले असा ग्राह्य धरला. त्यांनी हरीश याला टॅक्स चोरीची नोटीस पाठवली व 25 लाखावर इन्कमटॅक्स लावला. इन्कमटॅक्स कार्यालयचे असे टॅक्स लावणे बरोबर आहे का?
या व्यवहारात आपसी प्रेम, मैत्री किंवा संबंध बघीतले जात नाही. येथे फक्त कायदाच बघीतला जातो. कायद्या प्रमाणे हि प्रॅाप्रटी अन्डरसेल झाली आहे. 1 कोटीची प्रॅाप्रटी 75 लाखाला मित्राला जरी दिली तरी या प्रॅाप्रटीच्या 25 लाखावर (100-75=25) इन्कमटॅक्सने टॅक्स लावले, ते कायद्याला धरून आहे. हरीश याला 25 लाखावर टॅक्स द्यायची इच्छा नव्हती म्हणून हा व्यवहार त्यानी 75 लाखाचाच दाखवला असे कायद्यात ग्राह्य धरले जाईल. म्हणून येथे इन्कमटॅक्स ऑफिसर यांचे म्हणणे बरोबर आहे.

प्रश्न – वरील उदाहरणात 75 लाखाला जी प्रॅाप्रटी हरीश यांनी कुशलला दिली त्याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशन जर 60 लाखच आहे, असे समजले तर टॅक्स किती रुपयावर लागेल?
- अशा वेळी वरील उदाहरणात हरीश यांना 75 लाखावर टॅक्स भरावे लागेल कारण विक्री किंवा स्टॅम्प ड्युटी किंमत या पैकी जे जास्त असेल त्यावर इन्कमटॅक्स (कॅपीटल गेन टॅक्स) लावला जातो इन्कमटॅक्सची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.