Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आपण सध्या बक्षीसा बद्दल बघत आहोत आता पर्यत याबद्दल आपण बघीतले की गिफ्ट म्हणजे नेमके काय. गिफ्ट वर टॅक्स कशा प्रकारे लावला जातो ? पूर्वीच्या गिफ्ट टॅक्स मध्ये आणि सध्याच्या टॅक्स पोझीशन मध्ये काय फरक आहे ? एका ने दुसऱ्याला प्रॉपर्टी

विकली तर स्टॅम्प ड्युटी किंमत आणि विक्री किंमत यातील फरकावर बक्षीस म्हणून टँक्स कशा प्रकारे लागतो, या वर ही चर्चा केली आहे. मित्राच्या मुलाला बक्षीस दिल्यास कधी टँक्स लागतो व कधी टँक्स लागणार नाही, हे हि बघितले आज आपण बक्षीसा बदल थोडी जास्त पन नवीन प्रकारे माहिती प्रश्नोत्तर रूपातच सोप्या भाषेत बघणार आहोत जे वाचकांना व्यवहारात अत्यत उपयोगी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही

प्रश्न- समजा फर्नांडिस यांनी रामराव यांचा मुलगा लग्नानिमित श्यामला – ४० हजार रुपये बक्षीस म्हणून दिले तर शाम याला दिलेल्या बक्षिसावर इन्कमटॅक्स लागेल का? रामराव आणि फर्नांडिस हे दोन्ही जवळचे मित्र असुन शाम हा रामरावाचा एकुलता मुलगा आहे ?-येथे लग्नाचे पन निमित आहे, या मुळेही कोणालाही इन्कमटॅक्स लागणार नाही अधिक स्पष्टीकरणसाठी पुढील प्रश्नाचे ही उत्तर बघावे

प्रश्न- समजा वरील उदाह्ररनातच थोडा बदल झाला. फर्नांडिस यांनी श्यामला ४० हजार रुपय दिले परंतु लग्नाचे निमित नव्हते तर शमला टॅक्स लागेल का ? 

-येथे पण कोणालाही गिफ्ट वर टँक्स लागणार नाही. याचे कारण असे कि इन्कमटँक्स कायद्याप्रमाणे ५० हजार पर्यंत चे जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस देत असेल तर असेल तर दुसऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा इन्कमटँक्स लागणार नाही. त्याच्या इतर उत्पनात ही रकम जोडली जाणार नाही म्हणून येथेही फर्नांडिस किंवा रामराव किंवा शाम कुणालाही ४० हजारावर टँक्स लागणार नाही.