Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - इ. व्ही. सी. ( EVC CODE ) म्हणजे काय ?
(अनंत दिवान, नि. बँक मॅनेजर पूना)

- Electronic Verification Code यालाच EVC असे म्हणतात सोप्या भाषेत याला असे म्हणता येईल की जर आधार नंबरला पॅन नंबर आणि तसेच मोबाईल नंबर लींक केलेले असेल तर एक कोड जनरेट होऊ शकतो जो मोबाईलवर पाठवला जातो त्या कोड नंबरला EVC CODE म्हटले जाते. या कोडला log in करून इन्कमटॅक्सच्या e-verification window द्वारे e-verify करू शकतो या मुळे आपल्याला इन्कमटॅक्सची पावती (acknowledgement) बँगलोरला स्पीड पोस्टने पाठवायची गरज राहत नाही. हे EVC इंटरनेट बँकींग द्वारे आणि डी मॅट अकाउंट द्वारे सुद्धा करू शकतो. म्हणून EVC Code वापरणे केव्हाही उत्तम, असे समजावे. 

                             आज पासुन आपण नवीन परन्तु एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय व्यवहारात खूप खूपच महत्वाचा आहे. आज कोणी पण कोणाच्याही नावाने रजिस्ट्री वगेरे करतात तथा असे समजतात की आता आम्ही रजिस्ट्रीद्वारे व्यवहार केला म्हणून आम्हाला काहीच चिंता करायचे कारण नाही. परन्तु इन्कमटॅक्स वाल्यांची नजर वेगळीच असते. कॅश व्यवहार असो, रजिस्ट्री असो किंवा कसलेही व्यवहार असो, हे त्यांच्या नजरेतून सुटणे फारच अवघड गोष्ट आहे. आपण अशाच व्यवहाराबाबत सोप्या परन्तु प्रश्नोत्तर रूपात बघणार आहोत, जे व्यवहारात फारच उपयोगी आहे. चुकुन केलेली चूक सुद्धा इन्कमटॅक्सच्या चाणाक्ष नजरेस पडल्यानंतर करदात्याची काय केवीलवाणी परिस्थिती उत्पन्न करू शकते, हे आपण संक्षिप्तपणे बघणार आहोत. जे अभ्यासु वाचक आहेत, त्यांनी जर प्रकरण नेहमी दोनदा किंवा तीनदा वाचल्यास त्यांना याचे बारकावे सुद्धा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

प्रश्न - जर एक व्यक्ती (पर्सन) दुसऱ्या व्यक्तीकडून कुठल्याही मोबदल्याच्या स्वरूपात 50,000 पेक्षा जास्तीची रोख रक्कम बक्षीस म्हणून घेत असेल तर कायद्याने काय परिणाम होतील ? इन्कमटॅक्स कशा प्रकारे लावला जाईल ?

1) गीफ्ट टॅक्स म्हणजे काय ?
- जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही बक्षीस देत असेल तर त्यास गीफ्ट म्हणतात व त्या बक्षीसावर लागणाऱ्या टॅक्सला कायद्यात गीफ्ट टॅक्स म्हणतात.

2) गीफ्ट टॅक्स किती रुपया पर्यन्त माफ आहे ?
- जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून काही नगदी रुपये देत असेल तर 50,000 पर्यन्त गीफ्ट टॅक्स लागणार नाही.

अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.