Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आज पासुन आपण नवीन विषय घेत आहोत. आता पर्यन्त आपण परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन बद्दल सविस्तर बघीतले. परवा येणारी 31 जुलाई ही व्यक्तीसाठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. 31 जुलाई पर्यन्त रिटर्न न भरल्यास काय दंड (पेनाल्टी) लागु शकते या बद्दल आपण सविस्तर सोप्या भाषेत परन्तु प्रश्नोतर रूपात चर्चा करणार आहोत, जे वाचकांना व्यवहारात खूप उपयोगी राहील.

प्रश्न – व्यक्ती म्हणजेच विशेष करून पगारदार व्यक्ती किंवा छोटे व्यापारी यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख काय आहे? 
- पगारदार व्यक्ती यांना इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख येणारी 31 जुलाई आहे. याचाच अर्थ असा की आर्थिकवर्ष 2017 -18 चे रिटर्न 31 जुलाई 2018 पर्यन्त भरणे गरजेचे आहे जर ३१ जुलाई पर्यन्त इन्कमटॅक्स रिटर्न भरले नाही तर त्यांना (दंड) पेनाल्टी भरावी लागेल. हा बदल मोदी सरकारने अर्थसंकल्प 2017 पासुन आणला आहे, जो या चालु आर्थिकवर्ष 2017 -18 पासुन लागु झाला आहे.

प्रश्न - व्यापाऱ्यांसाठी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे ? 
- असे व्यापारी किंवा व्यक्ती किंवा इण्डस्ट्रियालिस्ट ज्यांना आर्थिकवर्ष 2017 -18 साली ऑडीट करणे कायद्याने आवश्यक नाही त्यांना सुद्धा इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलाई आहे.

प्रश्न – ऑडीट केस साठी रिटर्न फाइल करण्याची अंतिम डयुडेट काय आहे ? 
- असे व्यक्ती ज्यांना टॅक्स ऑडीट लागु आहे, त्यांना इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

प्रश्न - 31 जुलाई पर्यन्त रिटर्न दाखल न केल्यास काय पेनाल्टी लागेल ?
- ज्या व्यक्तींची रिटर्न दाखल करण्याची डयुडेट 31 जुलाई आहे, व त्यांचे उत्पन्न 5 लाखाच्या आत आहे त्यांना 1 हजार रुपये पेनाल्टी दयावी लागेल. परन्तु जर उत्पन्न 5 लाखाच्या पेक्षा जास्त असेल व रिटर्न 31 डीसेंबर पर्यन्त भरले तर पेनाल्टी 5000/- रुपये तथा इतर वेळी पेनाल्टी 10,000/- भरावी लागेल. म्हणून 31 जुलाई पर्यन्त रिटर्न भरण्याची ज्यांना ड्यूडेट आहे त्यांनी ताबडतोब त्यापूर्वी रिटर्न भरून पुढील कटकटी पासुन मुक्त राहावे. 

इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढील आठवड्यात बघणार आहोत.