आपण गेल्या अनेक आठवड्यापासुन 'पॅन' बद्दल सविस्तर बघत आहोत. आता पर्यंत उजळणी व्हावी म्हणून लिहीत आहे की आपण पॅन म्हणजे काय इथून सुरु करून पॅन कोणास घेण्याची आवश्यकता आहे ? करदाता व्यक्ती असेल तर त्यास ओळख म्हणजेच आइडेन्टीटी प्रुफ म्हणून कुठले कागदपत्र देता येतात ? प्रुफ ऑफ आइडेन्टीटी सह अजुन कोण कोणती कागदपत्रे दयावी लागतात जी बंधनकारक ही आहेत ? प्रुफ ऑफ अॅड्रेस म्हणजे काय व त्या साठी कोणते कागदपत्र दयावे लागतात ? जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे दयावी लागतात ? अे. ओ. पी. तथा बी. ओ. आय. साठी कोणती कागदपत्रे दयावी लागतात ? नवीन कम्पनी किंवा फर्म काढायची असेल तर कोण कोणती कागदपत्रे लागतात ? कायद्या प्रमाणे पॅन नंबर किती दिवसात मिळायला पाहिजे ? सी. बी. डी. टी., एन. एस. डी. एल. वगेरे म्हणजे नेमके काय ? पॅन चे स्पेशल फीचर म्हणजे वैशिष्ट्ये काय आहे ? पॅन कार्ड हरवल्यास नवीन कार्ड मिळु शकतो का ? मिळण्यास काय प्रोसीजर करावी लागेल ? आर्थिक कागदपत्र म्हणजे काय ? ईत्यादी बद्दल सोप्या भाषेत सविस्तर माहिती बघीतली. आज आपण क्लीष्ट परन्तु व्यवहारात अत्यंत उपयोगी अशी पॅन बद्दल माहिती बघणार आहोत. आपण बघणार आहोत की व्यवहारात ही असे कोण कोणते व्यवहार आहेत की जेथे पॅन नंबर देणे कायद्याने अत्यंत गरजेचे आहे. जर या व्यवहारात नंबर दिले गेले नाही तर हे व्यवहार प्रसंगी रद्द ही ठरवले जाऊ शकतात. हे आपण प्रश्नोत्तर रूपात सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न - मोटर वाहन खरेदी किंवा विक्री करायची असल्यास पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ?
प्रश्न - मोटर वाहन खरेदी किंवा विक्री करायची असल्यास पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ?
- होय मोटर वाहन म्हणजे कुठले ही फोर व्हीलर किंवा त्या पेक्षा जास्त व्हीलर खरेदी किंवा विक्री करायचे असल्यास पॅन नंबर देणे कायद्याने गरजेचे आहे. मोटर वाहनला एक स्पेशल अर्थ देण्यात आला असून जे मोटर वाहन मोटर वेहीकल एक्ट 1988 च्या कलम 2(28) मध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, त्या वाहनाचा यात समावेश होतो. सोप्या भाषेत यालाच आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक मोटर वाहन यास पॅन नंबर देणे कायद्याने आवश्यक आहे.
प्रश्न - टू व्हीलर खरेदी किंवा विक्री साठी पण नंबर देणे गरजेचे आहे का ?
प्रश्न - टू व्हीलर खरेदी किंवा विक्री साठी पण नंबर देणे गरजेचे आहे का ?
- नाही. आर्थिक व्यवहार जे मोटर वाहन नियम कायद्यान्वये येतात, त्या टू व्हीलर साठी पण नंबर देणे गरजेचे नाही परन्तु दुसऱ्या कलमा प्रमाणे जर व्यवहारात गरज पडल्यास पॅन नंबर दयावा लागतो. व्यवहारात मात्र टू व्हीलर कम्पनी चे अधिकारी ही पॅन ची मागणी करतांना दिसतात.
प्रश्न – एल. आय. सी. चे हफ्ते भरतांना पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ? असल्यास कोणत्या रकमे पर्यन्त पॅन देण्याची गरज नाही ?
प्रश्न – एल. आय. सी. चे हफ्ते भरतांना पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ? असल्यास कोणत्या रकमे पर्यन्त पॅन देण्याची गरज नाही ?
- प्रत्येक व्यवहारात एल. आय. सी. ला पॅन नंबर देण्याची कायद्याने आवश्यकता नाही. सामान्य नागरीक ज्यांचे विम्याचे हप्ते 50 हजारापेक्षा कमी आहे, त्यांना पॅन नंबर देण्याची अजिबात आवश्यकता नाही. मात्र ज्यांची रकम एका वर्षात 50 हजारापेक्षा जास्त असेल आणि जर ते इन्शूरन्स एक्ट च्या कलम 2 (9) प्रमाणे असेल तर पॅन देणे गरजेचे आणि कायद्याने बंधनकारक आहे.
पुढील आठ्वड्यापासुन आपण अजुन कोण कोणत्या आर्थिक व्यवहारात पॅन देणे गरजेचे आहे. मायनर (नाबालिक) यांच्या साठी काय कायदा आहे ? बँके साठी, म्युच्युअल फंड साठी, पोस्ट ऑफिस डीपॉजीट साठी, शेअर मार्केट साठी पॅन चा कायदा काय म्हणतो, अशा ईत्यादी बाबी ज्या तुम्हाला आम्हाला दैनंदिन व्यवहारात उपयोगी आहेत, त्याची माहिती बघणार आहोत. अनेक व्यक्ती व्यवहारात पॅन दयायचे विसरतात तर असे व्यवहार कायद्याने रद्द ही होऊ शकतात. वरील सर्व बाबीची माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.