आपण गेल्या अनेक आठवड्यापासून 'पॅन' बद्दल ची सविस्तर माहिती बघत आहोत. आज आपण या बद्दल बघीतले की टू व्हीलर सोडुन कोणते ही वाहन घेतल्यास पॅन नंबर ची आवश्यकता आहे. आपण एल. आय. सी. मध्ये किती पैसे भरतांना पॅन नंबर लागतो, हे ही बघीतले. आज आपण अजुन कोण- कोणत्या व्यवहारात पॅन नंबर लागतो, याची माहिती सोप्या प्रश्नोत्तर रूपात बघणार आहोत, जे व्यवहारात अत्यंत उपयोगी आहेनवीन कार्ड मिळु शकतो का ?
प्रश्न - बँकेत अकाउंट उघडतांना पॅन नंबर लागतो का ? त्याची सविस्तर माहिती दयावी
प्रश्न - बँकेत अकाउंट उघडतांना पॅन नंबर लागतो का ? त्याची सविस्तर माहिती दयावी
- कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा को-ऑपरेटीव बँकेत खाते उघडायचे असल्यास पॅनकार्ड ची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. मात्र टाइम डीपॉजीट किंवा बेसीक सेव्हींग अकाउंट यात आवश्यकता नसली तरी बँक वाले पॅन नंबर व्यवहारात मागतांना दिसतात. येथे बँक किंवा को-ऑपरेटीव बँके म्हणजे जेथे बँकींग रेग्युलेशन एक्ट 1949 लागु आहे अशी बँकींग कम्पनी समजण्यात यावी.
प्रश्न - डेबीट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड साठी अर्ज करतांना पॅन नंबर दयावा लागतो का?
प्रश्न - डेबीट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड साठी अर्ज करतांना पॅन नंबर दयावा लागतो का?
- होय. ज्या बँकींग कम्पनी किंवा अशा बँक जेथे बँकींग रेग्युलेशन कायदा 1949 लागु आहे. तेथे डेबीट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड साठी अर्ज केल्यास पॅन कार्ड चे झेरॉक्स देणे कायद्याने बंधनकारक आहे.
प्रश्न – हॉटेल किंवा रेस्टॉरण्ट मध्ये पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ? दयावे लागल्यास याची मर्यादा काय आहे ?
प्रश्न – हॉटेल किंवा रेस्टॉरण्ट मध्ये पॅन नंबर देणे आवश्यक आहे का ? दयावे लागल्यास याची मर्यादा काय आहे ?
- हॉटेल किंवा रेस्टॉरण्ट मध्ये दर वेळेस पॅन नंबर देण्याची आवश्यकता नाही. जर हॉटेल किंवा रेस्टॉरण्ट चे एक वेळचे बील 50,000/- पेक्षा जास्त होत असेल तर पॅन नंबर देणे कायद्याने आवश्यक आहे.
प्रश्न - डी मॅट अकाउंट उघडण्यासाठी पॅन नंबर लागतो का ?
प्रश्न - डी मॅट अकाउंट उघडण्यासाठी पॅन नंबर लागतो का ?
- शेअर मार्केट च्या व्यवहारासाठी किंवा शेअर खरेदी केल्यास डी मॅट अकाउंट उघडावा लागतो. हा डी मॅट अकाउंट सेबी कायदा 1992 च्या कलम 12 (1 A) अनुसार अधिकृत एजन्सीकडे उघडायचा असेल तर कायद्याने पॅन नंबर देणे आवश्यक आहे. हा डी मॅट अकाउंट हल्ली व्यवहारात उघडने अत्यावश्यक झालेले आहे.
प्रश्न - पोस्ट ऑफीस मध्ये पॅन ची आवश्यकता कधी पडली ?
प्रश्न - पोस्ट ऑफीस मध्ये पॅन ची आवश्यकता कधी पडली ?
- जेव्हा पोस्ट ऑफीस मध्ये 9 नोव्हेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2016 च्या मध्ये 2,50,000/- पेक्षा जास्तीची रोख रकम भरण्यात आली तेव्हा पॅन नंबर देणे आवश्यक होते. आपण सगळे आता विसरलो आहोत की हा 9 नोव्हेंबर पासुन नोटबंदी आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपासुन 500 आणि 1000 च्या नोटा अचानक बंद केल्या होत्या आणि 31 डिसेंबर 2016 पर्यन्तचा काळ आपल्या नोटा जमा करण्यासाठी दिला होता त्या काळात प्रत्येकास पैसे जमाकरतांना पॅन नंबर देणे आवश्यक होते.
आपण पॅन नंबर देणे अजुन कोण- कोणत्या व्यवहारात आवश्यक आहे, हे पुढील आठवड्यात बघणार आहोत
आपण पॅन नंबर देणे अजुन कोण- कोणत्या व्यवहारात आवश्यक आहे, हे पुढील आठवड्यात बघणार आहोत