Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

आपण सध्या पॅन बद्दलची सविस्तर माहिती बघत आहोत .

प्रश्न – म्युचुअल फंड खरेदी करतांना पॅन नंबर कधी देणे आवश्यक आहे ? 

 - ५०,००० पेक्षा जास्त रुपयाचे म्युचुअल फंड खरेदी करतांना पॅन नंबर देणे कायद्याने आवश्यक आहे .

प्रश्न – रिझर्व बँक ऑफ इंडिया वगैरे ने बॉंड काढले तर पॅन नंबर कधी देणे आवश्यक आहे ? 

- रिझर्व बँक ने बॉंड काढले तर रु.५०,००० पेक्षा जास्तीचे बॉंड खरेदी करावयाचे असल्यास पॅन नंबर देणे आवश्यक आहे.

प्रश्न – आजकाल फॉरेन टूर कॉमन झाले आहे ? या फॉरेन टूर मध्ये पॅन नंबर कधी व कशाप्रकारे देणे कायद्याने आवश्यक आहे ?
- आजकाल साधारण माणुस सुद्दा फोरेनला एकदा तरी जाऊन यावे असे ठरवतो. पूर्वी फॉरेन रिटर्न म्हणजे मोठी गोष्ट असायची मात्र आता जग फिरून यावे, अशी माणसाची अपेक्षा असते मात्र त्यात त्यांना अडचण सतावते ती इन्कमटॅक्सची, एकदा पॅन नंबर दिले की इन्कमटॅक्सची कटकट सुरु होईल, असे ही अनेकांना वाटत असते परन्तु व्यवहारात रु.५०,००० नगदी किंवा बँक डीडी किंवा कुठल्याही प्रकारे पेमेंट करायचे असल्यास पॅन नंबर हे देणे कायद्याने आवश्यक केले आहे. यात टॅव्हल एजन्ट ला पेमेंट केल्यास त्याचे ही वर्णन देणे आवश्यक आहे.

प्रश्न – सेक्युरिटीज चे पेमेंट मध्ये पॅन नंबर देणे कधी गरजेचे आहे ? 

- शेअर्स सोडून बाकी सेक्युरिटीज मध्ये जर पेमेंट एक लाखापेक्षा जास्त असेल तर पॅन नंबर देणे आवश्यक आहे.

प्रश्न – नॉट लिस्टेड कंपनी चे शेअर्स खरेदी करायचे असल्यास पॅन नंबर देणे कधी आवश्यक आहे ? 

- स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्स लीस्टेड नसल्यास व अशा कंपनी चे शेअर्स खरेदी किंवा विक्री करायची असल्यास एक लाखा च्या वर असे व्यवहार असल्यास पॅन नंबर देणे आवश्यक आहे.

पॅन नंबर ची तथा इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.