Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स ८

सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोतर सर्वांच्या लाभासाठी देत आहोत.

प्रश्न – 

1. My friend presently residing in USA. He is having 2 flats in India. One in mumbai and one in pune

2. He proposes to sell one flat in pune for value Rs. 1.29 CR. He Is coming in next week to execute sale deed .

3. As informed by him there is long term capital gain of Rs. 60 Lacs as belows –

To invest Rs. 25 lacs to purchase new flat - to invest 25 lacs in Rural electrification bond. Whether this adjustment will be correct ? Please guide me .
(राजीव गुर्जर, रिटायर्ड ब्रँच मॅनेजर, ICICI बँक, सांगली.)


दहालाखाचे काय करणार हे तुम्ही सांगीतले नाही . लॉन्ग टर्म कॅपिटल गेन वाचवण्याचे अनेक पर्याय आहे, त्या पैकी तुम्ही सुचवलेला ही एक पर्याय असु शकतो. तुमचा प्रश्न एक्दम स्पष्ट नसल्याने अधिक माहिती साठी सीएला प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी.

आज पासुन आपण कॅपीटल गेन मध्ये महत्वाचा विषय बघणार आहे आणि तो म्हण्जे कॅपीटल गेन एक्झम्पशन बद्दल. याचाच अर्थ असा की कॅपीटल गेनचे आलेल्या पैशावर एक पैसा ही टॅक्स लागु नये असे काही प्रोव्हिजन इन्कमटॅक्स कायद्यात आहेत का ? जर आहे तर ते काय आहेत. व्यवहारात इन्कमटॅक्स माफी कशी घेता येइल ईत्यादी बद्दलची माहिती आपण बघणार आहोत. सर्वात आधी कलम 54 बद्दल बघत आहोत.

प्रश्न - कलम 54 काय आहे ?
- कलम 54 हे कॅपीटल गेन टॅक्स माफी मिळण्याचे कलम आहे.

प्रश्न - या कलमाखाली टॅक्स माफी कशी मिळते ? - जेव्हा एका घराचे विकून आलेल्या पैशातुन दुसरे घर खरेदी केली जाते, तेव्हा येणाऱ्या पैशावर कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही.

प्रश्न - या कलमाची सुट कोण कोणत्या करदात्यांना मिळते ?
- या कलमाची सुट व्यक्ती आणि अविभक्ती हिंदु कुटुंब म्हण्जे एच. यु. एफ. यांना मिळते.

प्रश्न - रामराव यांनी कार्यालय विकून राहते घर विकत घेतले. त्यांना या कलमाची सुट मिळेल का ?

- नाही, कारण रामराव यांनी कार्यालय विकून घर घेतले म्हणून त्यांना ही सुट मिळणार नाही.

प्रश्न - समजा वरील उदाहरणात रामराव यांनी घर विकुन घर घेतले. विकलेले घर एक वर्षा पूर्वीच घेतलेले होते. त्यांना या कलमाची सुट मिळेल का ? 

- रामराव यांनी जरी घर विकुन नवीन घर घेतले म्हणून सुट मिळायला पाहिजे. परंतु त्यांना सूट मिळणार नाही याचे कारण असे की विकलेले घर हे लॉंग टर्म असेट म्हण्जे दीर्घ कालीन मालमता असली पाहीजे. येथे हे घर एका वर्षातच विकण्यात आले आहे.

प्रश्न - शामराव यांनी राहते घर विकून नवीन राहते घर चार वर्षानंतर घेतले तर त्यांना या कलमाची सूट मिळेल का ? 

- नाही मिळणार, कारण नवीन घर ३ वर्षाच्या आत घ्यायला पाहीजे.

प्रश्न - नवीन घर बांधकाम करायचे असल्यास याची मुदत काय आहे ? 

- नवीन घराचे बांधकाम दोन वर्षा पर्यन्त पूर्ण झाले पाहीजे, तर या कलमाची सुट मिळते. आपण पुढील आठवड्यात सूट मिळण्यासाठीचे विविध पर्यायी कलम बघणार आहोत, जे व्यवहारात उपयोगी ठरावे.