आपण गेल्या काही आठवड्यापासुन इन्कमटॅक्सच्या कॅपीटल गेन बद्दल बघत आहोत. सर्व सामान्य वाचकांना याचा फायदा व्हावा, म्हणून सउदाहरण अत्यंत सोप्या बोली भाषेत आपण चर्चा करीत आहोत. आज आपण नेहमी प्रमाणे वाचकांच्या प्रश्नोत्तर पासुन सुरु करणार असुन ज्या वाचकांचे प्रश्न अध्याप प्रसिद्ध झालेले नाही, त्यांनी व्हाट्सअप वर सविस्तर मुद्देसूद प्रश्न पुन्हा पाठवावे, म्हण्जे त्या प्रश्नांचे उत्तर देण्यात येईल.
प्रश्न - अहमदनगर येथे मला एक रीसेल प्लॉट विकत घ्यायचा आहे. विक्री किंमत १६ लाख अशी ठरली आहे. समोरच्या व्यक्तीने अगोदर तो प्लॉट ५ लाख या रकमेचा घेतला होता. आता या प्लॉट ची १६ लाख ला खरेदी केली तर प्लॉट विकणाऱ्या व्यक्तीला किती इन्कमटॅक्स बसु शकतो, या बद्दल माहिती हवी आहे. (महेश मांढरे, अहमदनगर)
- सदर प्लॉटची समोरच्या व्यक्तीची खरेदी किंमत ५ लाख रु. असुन तो प्लॉट सदर व्यक्ती १६ लाख रु. ला तुम्हाला विकत आहे. हे जरी बरोबर असेल तरी या व्यक्तीने तो प्लॉट कोणत्या तारखेला खरेदी केला, ती किंमत त्या व्यक्तीची कॉस्ट ऑफ एक्विझिशन असेल. तो प्लॉट त्याने किती काळा पर्यंत ठेवला व तुम्हाला विकण्याचा करार कधी झाला, या वर अवलंबुन आहे. विक्री किंमत आणि खरेदी किंमत या वर जो फरक येइल त्या किमती वर कॅपीटल गेन टॅक्स लागेल.
या पूर्वी कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स या नियमाप्रमाणे त्याला खरेदी किंमत वाढवुन त्यास टॅक्स कमी करण्याचा फायदा मिळेल. मग हे शॉर्ट टर्म कॅपीटल गेन आहे की लॉंग टर्म या वर टॅक्स किती लागेल याचा निर्णय तुम्हाला घेता येइल. लॉंग टर्म म्हण्जे दीर्घ कालीन भांडवली नफा असल्यास निव्वळ नफ्यावर २० टक्के या प्रमाणे त्यांना टॅक्स भरावे लागेल. जर हे शॉर्ट टर्म म्हण्जे अल्पकालीन भांडवली नफा असल्यास त्यांना रेग्युलर टॅक्स रेट प्रमाणे टॅक्स भरावा लागेल.
प्रश्न - रामराव यांनी एक प्रॉपर्टी १० लाखाला विकली. ज्याची खरेदी किंमत २ लाख होती.त्या प्रॉपर्टी वरील टॅक्स वाचवण्यास काही पर्याय असतात का टॅक्स भरावेच लागेल ?
- रामराव यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कोणता पर्याय वापरावा, हा त्यांचा इच्छेचा प्रश्न असुन जर त्यांनी कुठलाच पर्याय वापरला नाही, तर त्यांना इन्फ्लेशन इंडेक्सेशनचा फायदा घेऊन निव्वळ कॅपीटल गेन वर इन्कमटॅक्स लागेल. इन्कमटॅक्स वाचवण्याचे वेगवेगळे अनेक पर्याय आपण पुढे बघणार आहोत.