सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोतर सर्वांच्या लाभासाठी देत आहोत.
प्रश्न - माझा मित्र अमेरिकेत राहतो. त्याचे भारतात दोन फ्लॅट आहेत. एक फ्लॅट मुंबईत तथा दुसरा पुण्यात आहेत. पुण्याचे फ्लॅट 1.29 कोटी रु. ला विकण्याचा विचार चालु आहे. तो पुढील आठवड्यात येणार असुन त्याचे कॅपीटल गेन 60 लाख रु. आहे. त्यातले 25 लाखाचे नवीन फ्लॅट तथा 25 लाख रूरल इलेक्ट्रिकेशन बॉण्ड मध्ये गुंतवायचा विचार आहे ? कृपया हे बरोबर आहे का ? मार्गदर्शन करावे.
(राजीव गुर्जर, रिटायर्ड ब्रँच मॅनेजर, ICICI बँक, सांगली.)
- दहालाखाचे काय करणार हे तुम्ही सांगीतले नाही. लॉन्ग टर्म कॅपीटल गेन वाचवण्याचे अनेक पर्याय आहे, त्यापैकी तुम्ही विचारलेला एक पर्याय असु शकतो. तुमचा प्रश्न एकदम स्पष्ट नसल्याने अधिक माहितीसाठी सी ए ला भेटावे.
सध्या काही आठवड्यापासुन आपण कॅपीटल गेन टॅक्स बद्दल बघत आहोत. इन्कमटॅक्सच्या अनेक उत्पन्नापैकी कॅपीटल गेन टॅक्स पासुन सरकारला महत्वाचे उत्पन्न मिळत आहे. यात आपण कॅपीटल असेट, कॅपीटल गेन, इंडेक्सेशन, कॅपीटल गेन वाचवण्याच्या अनेक प्रकारांपैकी कलम 54 ची सुट अशा अनेक बाबी बघीतल्या. आज आपण यात सुट मिळण्यासाठी अजुन कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याची एक - एक करून सविस्तर माहिती प्रश्नोत्तर रुपी सोप्या भाषेत बघणार आहोत, ज्याचा वाचकांना व्यवहारात खूप उपयोग होऊ शकतो.
प्रश्न - संध्या सक्सेना यांनी दोन फ्लॅट विकले परंतु दोन्ही फ्लॅटचे प्रवेश द्वार (Entrance) एकच होते. यात ला एक फ्लॅटला Beauty Parlour (ब्युटी पार्लर) साठी वापरत होत्या. त्यांनी दोन्ही फ्लॅट एकाच विक्री पत्राद्वारे विकले आणि हे कॅपीटल गेनचे आलेले पैसे नवीन राहत्या घरासाठी गुंतवले. परंतु आयकर अधिकाऱ्यांनी कॅपीटल गेन एक्झेम्पशन म्हण्जे सूट देण्याचे नाकारले. संध्या सक्सेना यांनी काय करावे ?
- आयकर अधिकाऱ्यांनी ब्युटी पार्लर ला वापरलेल्या जागेसाठीची सुट नाकारली. परंतु कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स यांनी त्यांना सुट माफी दिली. या फ्लॅट वर कुठलेही डिप्रीसिएशन म्हण्जे पूर्वी घसारा घेतला नव्हता. या दोन्ही फ्लॅट चे प्रवेश द्वार पण एकच होते म्हणून त्या दोन्ही प्रॉपर्टी एकच धरून कलम 54 ची सुट देण्यात आली. हे प्रकरण इन्कमटॅक्स ऑफिसर विरुद्ध संध्या सक्सेना यांचे मुंबई ट्रीब्युनलचे केस आहे.
कॅपीटल गेन बद्दलची सुट मिळण्यासाठीची अधिक माहिती तथा इतर पर्याय आपण पुढील आठवड्यापासुन बघणार आहोत.