Pages

About

जालना
वाट्सअप नं. 9422218428

Jalna
Whatsapp No. 9422218428

सोप्या भाषेत इनकम टॅक्स

सध्या आपण दहाहजारापेक्षा जास्तीची रक्कम खर्च करू नये, केल्यास काय परिणाम होतात. या कलमासाठी काही माफी आहेत का ? इत्यादी बद्दल बघीतले आज आपण या बद्दल चे काही शंका बघणार आहोत. त्यापूर्वी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.

प्रश्न - सर, मी वरिष्ठ नागरिक आहे. माझा छोटा प्रश्न आहे. माझे एकूण उत्पन्न ३,५०,०००/- रु आहे, जे टोटल बँक व्याज आहे. वरिष्ठ नागरिकांना ५० हजार व्याज माफ आहे. तर मी असे मानु शकतो का टॅक्सेबल इन्कम ३ लाख माफ असुन मला इन्कमटॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. 
( प्रमोद कुलकर्णी, १४०२, किंगस्टोन पलेस, चिंचोली बंदर रोड, मालाड ( वेस्ट ) मुंबई. ) 
- तुमचे मानने की ५० हजार व्याजाचे वरिष्ठ नागरिकांना माफ आहे, हे बरोबर आहे. कारण आता वरिष्ठ नागरिकांना कलम ८० टीटीबी खाली नवीन वजावट मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही पात्र आहात. आणि या मुळे तुम्हाला टॅक्स भरण्याची अवशक्ता नाही परन्तु रीतसर इन्कमटॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे.

प्रश्न – बँक सुट्टीच्या दिवशी रोख पेमेंट १००००/- च्या वर करण्यात आले तर परिणाम काय होणार ? 
- अपवादाच्या रुल मध्ये हे इन्कमटॅक्स कायद्यात दिलेले आहे की बँकेला सुट्टी असेल त्या दिवशी किंवा स्ट्राइक ( हरताळ ) असेल त्या दिवशी जर पेमेंट १००००/- च्या वर करण्यात आले तरी त्याचे डीसअलौन्स होणार नाही. म्हणजेच याला सोप्या भाषेत असे म्हणता येईल की अशा खर्चाची वजावट इन्कमटॅक्स मध्ये करदात्यास मिळणार. त्याला बँक सुट्टी मुळे कुठलीही अडचण होणार नाही. करदात्यास बँक सुट्टीचा फायदा घेता येईल.

प्रश्न – जेनुइन पेमेंटची वजावट मिळते का ? 
- जेनुइन पेमेंट म्हणजे नैसर्गिक किंवा वास्तविक पेमेंट होय. राजस्थान हायकोर्ट यांनी श्रीमती. हर्षीला चोरडिया विरूद्ध इन्कमटॅक्स ऑफिसर या केस मध्ये असे सांगितले की इन्कमटॅक्स मध्ये दिलेली यादी ही परिपूर्ण नाही. असाच निर्णय गिरिधारीलाल गोयंका च्या केस मध्ये कलकत्ता हायकोर्ट यांनी दिले आहे. याचाच साधा अर्थ असा की, नैसर्गिक किंवा वास्तविक पेमेंट असेल तर इन्कमटॅक्स त्याला नाकारु शकणार नाही. इन्कमटॅक्सची नवीन माहिती आपण पुढील आठवडयात बघणार आहोत.